Sanjay Raut Saam TV
मुंबई/पुणे

शाहरुख खानला ट्रोल करणाऱ्यांना राऊतांचे सडेतोड उत्तर म्हणाले, 'हा नालायकपणा…

एका गटाचे एका परिवाराचे लोकं हे काम करत आहे. हे लोक देशाची वाट लावत आहे .

जयश्री मोरे

मुंबई - लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी काल या जगाचा निरोप घेतला. त्यांना अंतिम निरोप देण्यासाठी सर्व बड्या नेत्यांसह चित्रपट जगतातील दिग्गज अभिनेते आणि अभिनेत्रीही पोहोचल्या होत्या. प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानही (Shahrukh Khan) आला होता. यादरम्यान शाहरुख खान त्याची मॅनेजर पूजा ददलानी सोबत पोहोचला आणि लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. पण सोशल मीडियावर लोकांनी शाहरुख खानला ट्रोल करायला सुरुवात केली. आता शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शाहरुख खानला ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

हे देखील पहा -

वास्तविक, लता मंगेशकर यांचे पार्थिव शिवाजी पार्कमध्ये अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी शाहरुख खानही लता मंगेशकर यांच्या अंतिम दर्शनासाठी पोहोचला होता. यादरम्यान शाहरुखने त्याच्या धार्मिक मान्यतांनुसार केलेल्या एका कृतीवरुन चुकीचे दावे केले जात आहे. यानंतर शाहरुख खानने लता मंगेशकर यांच्या चरणांना स्पर्श केला. मात्र शाहरुखने लता मंगेशकर यांच्या पायावर थुंकल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली. यानंतर लोकांनी काहीही विचार न करता शाहरुख खानला ट्रोल करायला सुरुवात केली. पण शाहरुखला पाठिंबा देण्यासाठी अनेक जण उभेही राहिले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शाहरुख खानचे समर्थन करताना ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, शाहरूखच्या कृतीवर उगाच ट्रोल केलं जातं आहे, एका गटाचे एका परिवाराचे लोकं हे काम करत आहे. हा नालायकपणा आहे, तुम्हाला बाकी काही उद्योग नाहीत. हे लोक देशाची वाट लावत आहे अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. ते पुढे म्हणाले, लता दीदी यांना कधीच विसरता येणार नाही. काहींनी पार्कात स्मारक बनवण्याची मागणी केली आहे. मात्र मागणीची गरज नाही, यावर राजकारण करू नका असा इशारा संजय राऊत यांनी भाजपला दिला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wardha : भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी केली काळी दिवाळी; सरकारचा निषेध करत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मविआचे धरणे

Maharashtra Live News Update : नवी मुंबईत भीषण आग, ६ जणांचा मृत्यू

Gauri Nalawade Photos: कानात झुमके अन् गुलाबी साडी... अभिनेत्री गौरी नलावडेचं सौंदर्य, लेटेस्ट फोटो पाहा

Reliance Diwali Offer : रिलायन्स डिजिटलची फेस्टिव्हल ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ऑफर; मोफत गिफ्ट्स आणि मोठ्या सवलती!

Sanjay Raut : राष्ट्रवादीचे ४ माजी आमदार भाजपच्या वाटेवर, संजय राऊतांनी शब्दाचे फटाके फोडले; म्हणाले, अजित पवार...

SCROLL FOR NEXT