Sanjay Raut
Sanjay Raut  Saam tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut : संविधान रक्षणाची लढाई प्रकाश आंबेडकरांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही; संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Vishal Gangurde

मयूर राणे, मुंबई

Sanjay Raut on Prakash Ambedkar :

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने काल १७ उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीने लोकसभेसाठी ९ उमेदवारांची यादी जाहीर केली. वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेनंतर ते महाविकास आघाडीत सामील होणार नाहीत, हे जवळपास स्पष्ट झालं आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. (Latest Marathi News)

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. या संवादादरम्यान संजय राऊतांनी राज्यातील विविध घडामोडींवर भाष्य केले. संजय राऊत म्हणाले, 'देशातील हुकूमशाही सरकारकडून सुरू असलेला भ्रष्टाचार, संविधानाची हत्या यासाठी आम्ही जी एक लढाई करतोय. त्यात प्रकाश आंबेडकरांशिवाय ही लढाई पूर्ण होई शकत नाही. संविधानाची रक्षा करणे ही आमचीच जबाबदारी नाही तर प्रकाश आंबेडकरांची आहे.

'मी पूर्ण खात्रीने सांगू शकतो की, भाजप प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत होईल, अशा प्रकारचं कोणतंही पाऊल प्रकाश आंबेडकर उचलणार नाहीत. आंबेडकरांचे विचार आणि आमचे विचार एक आहेत. पक्के आहेत',असे संजय राऊत म्हणाले.

महाविकास आघाडीच्या बैठकीविषयी संजय राऊत काय म्हणाले?

महाविकास आघाडीच्या बैठकीविषयी राऊत म्हणाले, 'आज गुरुवारी महाविकास आघाडीच्या तीन प्रमुख घटकांची बैठक आहे. ही बैठक खास करून प्रचार यंत्रणा, पुढील रणनीती अजेंडा यासंदर्भात चर्चा करण्यासाठी आहे. या बैठकीत जागावाटप किंवा जागांची अदलाबदली यासंदर्भात तिथे कोणतीही चर्चा होणार नाही. आता पुढील पाच टप्प्याच्या निवडणुका होत आहेत'.

'आता बैठकीत एकत्र सभा घेणे, प्रचाराची दिशा, निवडणुकीतील मुद्दे, राज्यातील प्रमुख प्रश्न, कोणत्या विभागात कोणी जावं, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची एकत्र सभा कुठे घ्यायला हवी, याबाबत आज चर्चा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yoga Tips: योगा केल्यानंतर करा या गोष्टी, शरीराला होईल फायदा

Today's Marathi News Live : पुण्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान कोयता गँगची दहशत; दुकानदाराला मारहाण

Ajit Pawar: शरद पवारांना भाजपसोबत जायचं नव्हतं, मग ६ बैठका का झाल्या? अजित पवारांचा सवाल

Thoda Tuza Ani Thoda Maza Serial: 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेतून प्रसिद्ध अभिनेत्रीचं छोट्या पडद्यावर कमबॅक; नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित

Petrol Diesel Rate 9th May 2024: बाहेरगावी जायचा विचार करताय ? त्याआधी जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलच्या किंमती

SCROLL FOR NEXT