Today's Marathi News Live : अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाला विरोध करणाऱ्या ईडीच्या प्रतिज्ञापत्रावर कायदेशीर टीमचा तीव्र आक्षेप

Maharashtra Chya Tajya Marathi Batmya Live (9 may 2024): महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी, देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी, लोकसभेच्या राजकीय घडामोडी लाईव्ह अपडेट वाचा एका क्लिकवर
 9 May 2024 Latest Updates  PM Narendra Modi and Sharad pawar  overall Maharashtra
9 May 2024 Latest Updates PM Narendra Modi and Sharad pawar overall MaharashtraSaam TV

अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाला विरोध करणाऱ्या ईडीच्या प्रतिज्ञापत्रावर कायदेशीर टीमचा तीव्र आक्षेप

अरविंद केजरीवाल यांच्या कायदेशीर टीमने सुप्रीम कोर्टात केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाला विरोध करणाऱ्या ईडीच्या प्रतिज्ञापत्रावर तीव्र आक्षेप नोंदवला

मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या कायदेशीर पथकाने सुप्रीम कोर्टात तक्रार केली

केजरीवाल यांच्या टीमकडून उपस्थित केलेले मुद्दे -

सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आणि उद्या सुप्रीम कोर्टाकडून निकाल जाहीर होण्यापूर्वीच प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आल हे कायदेशीर प्रक्रियेचे उल्लंघन आहे

सुप्रीम कोर्टाची परवानगी न घेता हे प्रतिज्ञापत्र दाखल केल आहे

अरविंद केजरीवाल यांच्या प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे

आता या प्रकरणी कोर्ट काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं

काँग्रेस उमेदवाराकडून 'घड्याळ' चिन्ह वापरत आचारसंहितेचा भंग

३४ पुणे लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी आपल्या निवडणुकीच्या प्रचारात 'घड्याळ' चिन्हाचा वापर केला आहे. जाणीवपूर्वक मतदारांची दिशाभूल करून मते मिळवण्यासाठी धंगेकर यांनी प्रचारासाठीच्या पत्रकांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 'घड्याळ' चिन्ह छापले आहे. ही कृती म्हणजे मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात जाऊन आचारसंहितेचा भंग आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून दोषींवर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

संजय राऊत यांच्या  दौऱ्याआधीच राजकीय वातावरण तापलं

संजय राऊत यांच्या विरोधात भाजप आक्रमक

नगरमध्ये अपशब्द वापरल्या प्रकरणी राऊत यांच्या विरोधात तक्रार दाखल

अंबड पोलिसांत भाजप पदाधिकाऱ्यांनी दिली तक्रार

राऊत उद्या सायंकाळी नाशिक दौऱ्यावर येणार

महसूल गुप्तवार्ता संचालनालयाची मोठी कारवाई, १५ कोटीचे अमली पदार्थ जप्त

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून १५ कोटी रुपयांच कोकेन जप्त

कोट डायव्हरी (Cote D'ivore) देशाच्या नागरिकाने कोकेन कॅप्सुसच केलं होत सेवन

कोकेनने भरलेल्या ७७ कॅप्सुल करण्यात आल्या जप्त

प्रवश्याकडून एकूण १ कीलो ४६८ ग्रॅम कोकेन जप्त

गोपनीय माहितीच्या आधारावर डीआरआयची कारवाई

भारतात उतरताच संशया वरून घेण्यात आल होत प्रवश्याला ताब्यात

चौकशीत कोकेनने भरलेल्या कॅप्सुल गिळल्याच केलं कबूल

जे जे रुग्णालयात दाखल करून जप्त करण्यात आल्या कोकेनने भरलेल्या कॅप्सुल

चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात ग्रामस्थाचा मृत्यू

मूल तालुक्यातील पडझरी- रत्नापूर जंगलात वाघाच्या हल्ल्यात ग्रामस्थाचा मृत्यू, आज सकाळी आशीष सोनूले (35) हा इसम गेला होता तेंदूपाने तोडण्यासाठी, इतरांसह पाने तोडत असताना अचानक वाघाने केला हल्ला, मात्र इतरांनी जोरदार आरडाओरडा केल्याने वाघ झाला पसार, मात्र या दरम्यान ग्रामस्थाचा झाला होता मृत्यू.

वैजापूर तालुक्यातील 102 गावं मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर वैजापूर तालुक्यातले जवळपास 102 गावातील नागरिक मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत आहेत. गेल्या आठवड्या मनापासून कालव्यातून पिण्यासाठी पाणी मिळावं अशी मागणी या 102 गावातील नागरिकांनी केली होती. मात्र नाशिक येथील जलसंपदा विभागातून त्यावर नकार देण्यात आला होता आणि त्या विरोधात या सगळ्या गावकऱ्यांनी आंदोलन उभे केलेला आहे. येत्या शनिवारी सर्व गावकरी नांदूर मधमेश्वर कालव्यामध्ये जाऊन जलसमाधी आंदोलन करणार आहेत . दुष्काळात पिण्यासाठी पाणी देत नसाल तर आम्ही मरू अशा भूमिकेत हे सगळे गावकरी आहेत जर जलसमाधी आंदोलनावेळी सरकारने दखल घेतली नाही तर पुढच्या काळामध्ये 102 गावातील गावकरी मतदानावर बहिष्कार टाकणार असा इशारा दिला आहे.

उद्धव ठाकरे यांचा जालना आणि संभाजीनगरचा 10 मे रोजी दौरा

दुपारी 2.30 वाजता रामा हॉटेल येथून संभाजीनगर एअरपोर्टकडे रवाना

दुपारी 3 वाजता जालनाकडे हेलिकॉप्टरने रवाना

4 वाजता जालना येथे सभेला उपस्थिती

5 वाजता हेलिकॉप्टरने संभाजीनगरकडे रवाना

5.30 वाजता संभाजीनगर येथे आगमन आणि हॉटेल रामा येथे विश्रांती

7 वाजता मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळ येथे सभेला उपस्थिती

रात्री 9 वाजता खाजगी विमानाने मुंबईच्या दिशेने रवाना

जाखेगावात वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, शेतातून घरी जाताना घटना

नागपूर जिल्ह्यातील मौदा पोलीस स्टेशन अंतर्गतजाखेगाव येथे आज वीज पडून शेतकऱ्यांच्या मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज 11 वाजताचा सुमारास घडलीय...रामाजी शिवरामजी आखरे असं मृत शेतकऱ्यांच नाव आहेय..

बारामतीच्या एमआयडीसीमध्ये भीषण आग, घटनास्थली अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

बारामतीच्या एमआयडीसीमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली असून ओपन स्पेस असलेल्या जागेमध्ये अतिक्रमण सामानाला आग लागली आहे अग्निशमन विभागाच्या वतीने ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू.

वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यात वीज अंगावर पडून १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस...

जांब येथील १४ वर्षीय दुर्गा कांबळे या मुलीचा विज पडुन दुर्दैवी मृत्यू झाला तर दुसरी रविना सुर्वे ही गंभीर जखमी..

घरासमोरील ओट्यावर खेळत असतांना अंगावर वीज पडल्याने घडली घटना....

जखमी मुलीला मंगरूळपिर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

नाशिक लोकसभेचे दोन दिग्गज उमेदवार प्रचार रॅली दरम्यान आमने सामने

सिन्नरच्या वावीमध्ये महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराज समोरासमोर

महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी घेतले शांतीगिरी महाराजांचे आशीर्वाद

शांतीगिरी महाराजांनी हेमंत गोडसेंना आशीर्वाद स्वरूप दिले श्रीफळ आणि बादली

बादली शांतीगिरी महाराज यांचे निवडणूक चिन्हं

भेटी दरम्यान दोन्ही गटाच्या समर्थकांकडून आप आपल्या उमेदवाराच्या जोरदार घोषणाबाजी

नाशिकच्या सटाणा तालुक्याला अवकाळीचा तडाखा, पिकांचं मोठं नुकसान

नाशिकच्या सटाणा तालुक्यातील मुंजवाड, खामताने, निरपूर व निकवेल परिसराला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावासाने तडाखा दिला असून,अचानक आलेल्या पावासाने कांदा बियाणे तसेच आंबा पिकाचे नुकसान झाले. सुमारे तासभर सुरू असलेल्या पावासाने सकल भागात पाणी साचले तर अनेक ठिकाणी नाल्यांना पाणी वाहू लागले होते..

संजय राऊत उद्या नाशिक दौऱ्यावर, राजाभाऊ वाजेंसाठी घेणार सभा

खासदार संजय राऊत दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर

जुने नाशिक परिसरात राजाभाऊ वाजेंसाठी संजय राऊत यांची जाहीर सभा

विजय करंजकरांचा ठाकरेंना जय महाराष्ट्र आणि बडगुजरांना तडीपारीची नोटीस बजावल्याच्या पार्श्वभूमीवर राऊतांचा दौरा महत्वाचा

शुक्रवारी संध्याकाळी राऊत नाशिकला येणार, शनिवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकाही घेणार

संजय राऊत नाशिकमध्ये येऊन काय बोलणार याकडं लक्ष

चंद्रपूर उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक संजय पाटील लाचलुचपतच्या जाळ्यात

लाच प्रकरणात फरारी असलेल्या चंद्रपूर इथल्या राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्याच्या कोल्हापुरातील घरांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज छापेमारी केली आहे. चंद्रपूर इथल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय जयसिंगराव पाटील यांनी बियर शॉपीला परवाना देण्यासाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांकरवी तक्रारदाराकडून लाखाची लाच घेतली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या चंद्रपूर पथकाने मंगळवारी सापळा रचून कारवाई केली आहे.

जालन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा महाविकास आघाडीला पाठिंबा

जालन्यात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ.कल्याण काळे यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंबा जाहीर केलाय. राज्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कोना सोबत आघाडी किंवा युती नाही, मात्र जालना लोकसभेत स्थानिक पातळीवर स्वाभिमानी ने महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याने दानवेंसमोर नवं राजकीय अवाहन उभं राहनार आहे, दरम्यान शेतकरी हितासाठीच आपण मविआ ला पाठींबा देत असल्याचं स्वाभिमानी चे जालना जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी सांगितलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जाहीर चर्चेसाठी निमंत्रण

सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती मदन बी लोकूर, दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश एपी शाह आणि ज्येष्ठ पत्रकार एन राम यांनी दिल निमंत्रण

निवडणुकीचा काळ सुरू असल्याने सध्याच्या मुद्यावर चर्चा करण्यासाठी दिलं निमंत्रण

दोघांकडे वेळ नसेल तर ते आपले प्रतिनिधी चर्चेला पाठवू शकतात असाही निमंत्रणपत्रिकेत उल्लेख

नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी चर्चेला येणार का याकडे लक्ष

आम्हाला शिवसेना नको होती म्हणून भाजपसोबत गेलो नाही, सुनील तटकरे यांचा दावा

२०१६ ला शिवसेना भाजप बरोबर असल्याने आम्ही भाजप बरोबर गेलो नाही. भाजपची भूमिका शिवसेनेला बरोबर ठेवण्याची होती. तर आम्हाला शिवसेना नको होती. आम्ही आल्यानंतर शिवसेनेने वेगळी भूमिका घेतली तर, तो त्यांचा निर्णय असेल. अशी भाजपची भूमिका होती.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन अर्जावर उद्या निर्णय

उद्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन अर्जावर सुप्रीम कोर्ट निर्णय देणार

मात्र त्यापूर्वी ईडी कडून सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल

ED ने प्रतिज्ञापत्रात मांडलेले महत्वाचे मुद्दे -

निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही त्यामुळे अंतरिम जामिनासाठी तो आधार असू शकत नाही

निवडणुकीच्या नावाखाली जामीनावर सोडवण्याचा प्रयत्न झाला तर यामुळे चुकीची परंपरा निर्माण होईल

या आधारावर निवडणूक लढविणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला आतापर्यंत अंतरिम जामीन मिळालेला नाही

डॉ.नरेंद्र दाभोलकर हत्या खटल्याचा निकाल उद्या, २०१३ मध्ये झाली होती हत्या

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणाचा निकाल उद्या देण्यात येणार आहे.या खटल्यात पाच आरोपींवर आरोप निश्चिती करण्यात आली असून हत्येनंतर १० वर्षांनी हे प्रकरण निकाली लागत आहे. डॉ.दाभोलकर यांची पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर २० ऑगस्ट २०१३ ला सकाळी पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

पुण्यातील सराफा दुकानातून २५ लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला

पुण्यातील सराफा दुकानात जबरी चोरी

२५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने केले चोरी

येरवडा भागात असलेल्या सराफा दुकानात ६ जणांनी केली चोरी

दुकानदाराचे लक्ष विचलित करून केली चोरी

महावीर ज्वेलर्स असे येरवडा भागात असलेल्या सराफ दुकानाचे नाव

चोरट्यांनी लंपास केले ३७२ ग्रॅम चे दागिने

ही घटना सी सी टिव्ही मध्ये कैद

येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल असून अधिक तपास सुरू आहे

पुणे शहराला वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पावसाला सुरुवात

गेली दोन दिवस पुणे शहराचे तापमान 41 सेल्सिअस पर्यंत पोहोचला होता

उकाड्याने हैराण झालेल्या पुणेकरांना आलेल्या अवकाळी पावसाने दिलासा

ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना हरवलं होतं, तिथे इतिहास घडवायचा आहे; रामदास आठवले

यामिनी जाधव यांनी विधानसभेत चांगलं काम केलं कुठल्याही जाती धर्माच्या लोकांचं काम केलेलं आहे. बऱ्याच वर्षानंतर एका महिलेला उमेदवारी दिली आहे. ज्यांनी बाबासाहेब आंबेडकर याना हरवलं होत त्या ठिकाणी इतिहास घडवायचा आहे. रिपब्लिकन पक्षाला एक जागा मिळायला पाहिजे होती. एकनाथ शिंदे यांचा आग्रह होता सदाशिव लोखंडे सोबत आले त्यांना ही जागा दिली. मी माझी नाराजी दूर करून प्रचारासाठी उतरलो आहे. मोठ्या प्रमाणात यश मिळाले होते.४० पेक्षा जास्त जागा जिंकणार आहे.

अवकाळी पावसाने चंद्रपुरातील रस्ते जलमय, जनजीवन विस्कळीत

अचानक आलेल्या पावसाने चंद्रपुरात जनजीवन विस्कळीत झाले. गेले आठवडाभर वाढत्या तापमानाने चंद्रपूरकर त्रस्त होते. आज दुपारी अचानक ढगांची दाटी होत विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. अचानक सर्वत्र अंधारल्याने महामार्गावरील वाहनांना देखील हेडलाईट लावून करावे मार्गक्रमण करावे लागले. या पावसाने चंद्रपूर शहरातील रस्ते जलमय झाले. आझाद बागेजवळील नाला ओसंडून वाहू लागल्याने गांधी चौक ते जटपुरा गेट मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. पाण्यातून वाहने बाहेर काढताना चालकांना चांगलीच कसरत करावी लागली. अनेक सखल भागात पाणी साचले. दरम्यान, या पावसामुळे तापमानापासून नागरिकांना मात्र जरा दिलासा मिळाला.

महायुतीच्या उमेदवारांची प्रचारासाठी उद्या नंदुरबारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा

महायुतीच्या उमेदवार डॉ हिना गावित यांच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या नंदुरबारमध्ये जाहीर सभा घेत आहे. डॉ.हिना गावित यांच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा नंदुरबारमध्ये येत आहेत. भाजपच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत आहे. एक ते दीड लाख लोक या सभेला येतील, असा विश्वास भाजपच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.

Mumbai News : नसीम खान आणि माझ्यामध्ये नाराजी नव्हती : वर्षा गायकवाड

वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?

नसीम खान आणि माझ्यामध्ये नाराजी नव्हती :

नसीमभाई आणि माझा नातं खूप जुनं आहे.

लहान बहीण जेव्हा मैदानात उतरील, तेव्हां मोठा भाऊ तिला आशीर्वाद द्यायसला नक्की येतो.

महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ CM शिंदेंचा रोड शो

शिवसेना, महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो

मुख्यमंत्र्यांचा उपस्थितीत रोड शोला सुरुवात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, शिवसेना उपनेते विजय नाहटा, माजी खासदार संजीव नाईक यांची देखील रोड शोला हजेरी

मुख्यमंत्री संपूर्ण बेलापूर मतदारसंघात रोड शो च्या माध्यमातून करणार प्रचार

रोड शोच्या माध्यमातून मोठ शक्ती प्रदर्शन

Sharad Pawar News : काँग्रेसमध्ये सरसकट सर्वच पक्ष विलीन होणार नाहीत; शरद पवारांचं मोठं वक्तव्य

शरद पवार काय म्हणाले?

काँग्रेसमध्ये सरसकट सर्वच पक्ष विलीन होणार नाहीत.

उद्धव ठाकरे गटाचं स्वातंत्र्य अस्तित्व आहे

भाजपसोबत जाण्याचा निर्णय झाला नाही.

Political News:  हरियाणात भाजप सरकार अल्पमतात, राष्ट्रपती राजवट लागू करा; काँग्रसची मागणी

भाजप सरकार अल्पमतात आल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा

हरियाणा काँग्रेसची राज्यपालांना पत्र लिहीत मागणी

३ अपक्ष आमदारांनी राजीनामा दिल्याने राज्यातील नायबसिंह सैनी सरकार अल्पमतात आल्याचा पत्रात उल्लेख

तर, काँग्रेसने सरकार बनवण्याचा निर्णय घ्यावा, त्यांनी जर सरकार बनवण्याचा दावा केला तर आम्ही पाठिंबा देऊ

१० आमदार असलेल्या JJP पक्षाचे प्रमुख दुष्यंत चौटाला यांची प्रतिक्रिया

Wardha : वर्ध्यात अचानक वातावरणात बदल; पावसाची हजेरी, पिकांना फटका

वर्धा जिल्ह्याच्या तापमानात मागील आठ दिवसात चांगलीच वाढ झाली होती. 44 अंशाच्या घरात पोहचलेल्या तापमानामुळे नागरिकांची लाहीलाही होत होती. अशातच वर्धेत सकाळी अचानक वातावरणात बदल होत अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची तारीख बदला; महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी

शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची तारीख बदला

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे मागणी

निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार दहा जूनला शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीचे मतदान

शाळांना 15 जूनपर्यंत असलेल्या सुट्ट्यांचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे शिक्षक परिषदेचे मत

बोगस मतदार नोंदणीच्या संदर्भातही कारवाई करण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी

Mumbai News : मुंबईत सहप्रवाशाकडून धावत्या रिक्षात महिलेचा विनयभंग

मुंबईत सहप्रवाशाकडून धावत्या रिक्षात महिलेचा विनयभंग करण्यात आला आहे.

जीव वाचवण्यासाठी महिलेने रिक्षातून मारली उडी, बोरिवली पश्चिमेकडील प्रकार

बुधवारी सकाळी महिला शेअर रिक्षातून प्रवास करत असताना घडली घटना

सहप्रवाशाकडून 29 वर्षीय महिलेचा रिक्षातच विनयभंग

मदतीसाठी महिलेने केला आरडा ओरड मात्र मदत मिळाली नाही

मदत न मिळाल्याने चालत्या रिक्षातूनच महिलेने उडी मारली

महिलेने बोरिवली पोलीस ठाण्यात दिली तक्रार

सीसीटीव्ही फुटेज च्या मदतीने पोलिसांनी प्रवाशासह रिक्षा चालकाविरोधात केला गुन्हा दाखल

बोरिवली पोलिसांनी केली आरोपी प्रवासी आणि रिक्षा चालकाला अटक

Air India : एअर इंडियाची मोठी कारवाई; 25 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं

एअर इंडियाच्या २५ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं

कामावर हजर न झाल्याने एअर इंडियाकडून कारवाई

कर्मचाऱ्यांच्य वागणुकीमुळे हजारो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला

त्यामुळ एअर इंडियाने कारवाई केल्याची दिली माहिती

दोन दिवसांपूर्वी अचानक एअर इंडियाच्या ७८ कर्मचाऱ्यांनी अचानक घेतली होती सामूहिक सुट्टी

त्यानंतर त्यांना हजार राहण्याच आवाहन करण्यात आलं होतं

Pune News : पुण्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान कोयता गँगची दहशत; दुकानदाराला मारहाण

पुण्यातील मोहम्मदवाडीत कोयता घेऊन दहशत माजवली

पानटपरीवाल्याला कोयता घेऊन मारहाण

दहशत माजवत कोयते रस्त्यावर नाचवले

कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये आज्ञाता विरोधात गुन्हा दाखल

टपरी चालक धर्मेंद्र गुप्ता हा कामगार जखमी

पाच तारखेला घटना घडली सर्व प्रकार सीसीटिव्ही मध्ये कैद

Nashik News : ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस

लोकसभा निवडणुकीदरम्यान सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस

ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांना तडीपारची नोटीस बजावली आहे.

परिमंडल दोनच्या उपयुक्त मोनिका राऊत यांनी काढली तडीपारीची नोटीस

water Issue : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा; जिल्हाभरात दुष्काळाची दाहकता

पुणे : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागरिकांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आल्याच चित्र निर्माण झालं आहे. मागच्या महिन्यात 298 गावे आणि 48 वाड्यांना 443 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात होता. मात्र या महिन्यात उष्णतेचा पारा वाढत आहे. यामुळे विहिरी, हातपंप आणि तलावातील पाणी पातळी घटली तर काही ठिकाणी छोटे मोठे प्रकल्प कोरडे देखील पडले आहेत. सद्यस्थितीत छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील 459 गावे तहानलेली आहेत. त्यांना 646 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.R

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची उद्या पुण्यात सभा

राज ठाकरेंची उद्या सायंकाळी पाच वाजता सारसबाग येथे होणार सभा

महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे यांची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही दुसरी सभा

आधी नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सभा झाल्यानंतर उद्या पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे घेणार सभा

उद्याच्या सभेसाठी राज ठाकरे मुंबईतून पुण्याकडे रवाना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com