अशा राजकीय गांजाडयांना मराठी माणूस चोपल्याशिवाय राहणार नाही  saam tv news
मुंबई/पुणे

अशा राजकीय गांजाडयांना मराठी माणूस चोपल्याशिवाय राहणार नाही

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

''महाराष्ट्रात तातडीने नशा मुक्ती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. नाहीतर राजकीय गांजाडयांना मराठी माणूस शिवसेना भवनाच्या फुटपाथवर बेदम चोपलयाशिवाय राहणार नाही.(समझनेवालोंको इशारा काफी है..) शिवसेना भवन हे मराठी अस्मितेचे ज्वलंत प्रतीक आहे. बाटगयांना हे कसे समजणार?'' अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेते प्रसाद लाड यांना इशारा दिला आहे.

प्रसाद लाड यांनी काल, वेळ आल्यास शिवसेना भवनही (ShivSena Bhavan) तोडू, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. माहीममध्ये (Mahim) राजा बढे चौकात भाजपच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी लाड यांनी हे वक्तव्य केलं. आपल्या वक्तव्याने वाद निर्माण होऊ शकतात असे समजल्यानंतर त्यांनी माफीही मागितली. आपण असं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. माझ्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचं प्रसाद लाड म्हणाले. आपल्या विधानामुळे कुणाचं मन दुखावलं असेल, तर त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो, सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करुन त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

आपल्या स्पष्टीकरणात बोलताना प्रसाद लाड म्हणाले की, मी शिवसेना भवन फोडणार अशा बातम्या प्रसारमाध्यमांनी दाखवल्या. पण माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. शिवसेना प्रमुखांवर आम्ही प्रेम करतो आणि त्यांचा आदरही ठेवतो. शिवसेनाप्रमुखांच्या शिवसेना भवनाबद्दल मी कोणतंही वक्तव्य केलं नाही. आम्ही माहीममध्ये जेव्हा येतो. तेव्हा एवढा बंदोबस्त ठेवला जातो, की जणूकाही आम्ही शिवसेना भवनच फोडायला जाणार आहोत, असं मला म्हणायचं होतं. असा दावा प्रसाद लाड यांनी दावा केला आहे. मात्र माध्यमांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला. मला कोणत्याही प्रकारे शिवसेना प्रमुख आणि शिवसेना प्रमुखांनी बांधलेल्या वास्तूचा अनादर करायचा नव्हता, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान प्रसाद लाड यांच्या वक्तव्यानंतर राज्याचे तंत्र शिक्षण मंत्री यांनीदेखील प्रसाद लाड यांच्यावर तोफ डागली. ''शिवसेना भवन फोडू म्हणणाऱ्या भाजपच्या काही पुढाऱ्यांच्या राजकीय विचारांच्या दिवाळखोरीच उत्तर महाराष्ट्रातील जनता नक्की निवडणुकीत ह्यांना भुईसपाट करून देईल. वंदनीय बाळासाहेबांचं शिवसेना भवन हे महाराष्ट्रासाठी भूषण आहे. जय महाराष्ट्र..! '' अशा शब्दात मंत्री उदय सामंत प्रसाद लाड यांच्यावर टिका केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : गुन्हे मागे घेण्यासंदर्भातील बैठकीत मराठा समाजासोबत दुजाभाव, योगेश केदार यांचा आरोप

PM Modi News Update : पंतप्रधान मोदींचा वाशिम दौरा पुढे ढकलला

Shirur Breaking News : शिरूरच्या घोडेगंगा साखर कारखान्यात राडा!

Dangerous Tourist Destinations : भारतातील सर्वात खतरनाक पर्यटनस्थळे, जाण्यापूर्वी एकदा विचार करा

Mumbai Fight Video: बारच्या वॉचमनशी वाद; कर्मचाऱ्यांनी थेट पोलिसांसमोरच तरुणाला केली बेदम मारहाण, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT