Sanjay Raut Saam Tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut Press Conference: महाराष्ट्र गां* अवलाद नाही; आम्ही कोणाला घाबरणार नाही

सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेली शिवसेना नेते संजय राऊतांची पत्रकार परिषद आज होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेच्या पत्रकार परिषदेची चर्चा होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रश्मी पुराणिक

मुंबई : सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेली शिवसेना नेते संजय राऊतांची पत्रकार परिषद आज होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून शिवसेनेच्या पत्रकार परिषदेची चर्चा होती. भाजपच्या साडे-तीन नेत्यांना आतमध्ये टाकणार असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काल सांगितल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. आज पत्रकार परिषदेत केंद्रीय तपास यंत्रणेला आणि भाजपला लक्ष्य करत आम्ही कोणालाही घाबरत नाही असे स्पष्ट सांगितले आहे. (Shiv Sena leader Sanjay Raut)

राऊतांनी सुरुवात करत म्हणाले, अनेक लढे याच व्यासपिठावर सुरू केले. या वास्तूने अनेक हलले पचवले. अतिरेक्यांचा हल्ला पचवला. महाराष्ट्र मराठी माणसावर आक्रमण सुरू आहे. त्याविरुद्ध कोणीतरी रणशिंग फुंकले हव् होते ते आपण फुंकत आहोत. (Shiv Sena Press Conference today)

मराठी माणसावर बाळासाहेबांनी आम्हाला मंत्र दिला. ते नेहमी सांगायचे तू काही पाप केलं नाही. गुन्हा केला नाही तर किनाच्या बापाला घाबरू नका. आज उद्धव ठाकरे यापद्धतीने शिवसेना पुढे घेऊन जात आहेत. त्याचप्रमाणे आम्हाला एकाच संदेश द्यायचा आहे. कितीही पाठीवर वर केले तर शिवसेना घाबरणार नाही.

राऊत म्हणाले, आम्हाला संदेश द्यायचा आहे, महाराष्ट्र गांडूची औलाद नाही. आम्ही घाबरणार नाही. तुम्ही नामर्दानगी करून कितीही वार केले तरी आम्ही थांबणार नाही. यासाठी हे पत्रकार परिषदेचे आयोजन आहे. अनेक आमच्या नेत्यांना त्रास दिला गेला. रविंद्र वायकर अनिल परब भावना गवळी पवारांचे कुटुंबीयांवर केंद्रीय तपास यंत्रणा ज्या पद्धतीने हल्ले करताय ते राज्यासह देशावरती संकट आहे. राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांना त्रास दिला गेला. केंद्रीय तपास यंत्रणेचे आमच्यावर हल्ले. हे देशावरचे संकट आहे. असेच संकट सरकार पश्चिम बंगालमध्येही आलं आहे.

महाराष्ट्रातील सरकार त्यांना पाडायच आहे आणि यासाठीच त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. त्यासाठी खोटे आरोप, बदनाम्या सुरु आहेत. दबाव सुरु आहे.

१७०च बहुमत अशताना भाजपचे नेते एक तारीख देतात. हे तुम्ही कोणाच्या भरोशावरती तारखा देतायत. वीस दिवसापुर्वी आणि भाजपचे काही प्रमुख लोक मला भेटले तीन वेळा आणि त्यांनी मला वारंवार हे सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही सरकार मधून बाहेर पडा. राष्ट्रपती राजवट लावू आमदार फोडू. काही लोकांनी मदत केली नाही तर केंद्रीय यंत्रणा तुम्हाला टाईट करतील त्यांची नावं आता घेत नाही पण भविष्यात घेईन ठाकरे सरकारला नख लागेल असं कृत्यू आमच्याकडून होणार नाही.

महाराष्ट्रातलं सरकार त्यांना पाडायचं आहे. सरेंडर व्हा अन्यथा, सरकार पाडू अशा धमक्या भाजप देत आहे. एकशे सत्तरचे बहुमत असताना भाजप कुणाच्या भरोशावर तारखा देत आहे?उपराष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे, ते सर्व त्या पत्रात आहे. माझ्यासारख्या लोकांना त्रास दिला जातोय असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tourist Spots: भारतातील सर्वाधिक भेट दिलेले 'ही' ५ पर्यटन स्थळ

Devendra Fadanvis : महाराष्ट्राने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवलाय; अभूतपूर्व विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

Priyanka Gandhi : वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा दणदणीत विजय; मोकेरी यांना 4 लाखांच्या फरकाने हरवलं

Uddhav Thackeray : लाटेपेक्षा त्सुनामी आली; महायुतीच्या विजयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महिला असुरक्षित,बेकारी वाढतेय- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT