Sanjay Raut on Supriya Sule Saam Tv News
मुंबई/पुणे

Sanjay Raut : तहान लागली म्हणून कोणी गटाराचं पाणी पित नाही; संजय राऊतांचा सुप्रिया सुळेंना सणसणीत टोला

Sanjay Raut on Supriya Sule : 'सुप्रिया सुळे याचं किंवा अन्य काही नेत्यांचं नाव तुम्ही वारंवार घेत आहात. त्यांना सत्तेची तहान नक्कीच लागली असेल. पण तहान लागल्यावर कोणी गटारातलं गढूळ पाणी पीत नाही.'

Prashant Patil

मुंबई : 'सुप्रिया सुळे यांचं नाव तुम्ही वारंवार घेत आहात. काही नेत्यांना सत्तेची तहान नक्कीच लागली असेल. मात्र, तहान लागली म्हणून गटारातलं गढूळ पाणी पीत नाही', असा सणसणीत टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना लगावला आहे. शरद पवारांच्या पक्षातील काही नेते भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. यावर संजय राऊत यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुक केल्याबाबत देखील संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. ते म्हणाले की, 'मुख्यमंत्र्यांनी या राज्याचे आणि देशाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय शरद पवार यांच्यातल्या अथक परिश्रम आणि सातत्याचं कौतुक केलं आणि त्याच्याबद्दल कोणाला आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. तुम्ही राजकीय टीका कितीही केली तरी हे जे एका नेत्यामध्ये गुण आहेत ते महाराष्ट्राला आणि देशाला मान्य करावे लागतील. नुसतं कौतुक करून चालणार नाही, परिश्रम, सातत्य, संयम या गुणांची कास देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील घेतली पाहिजे', असा टोला त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

राऊतांचा सुप्रिया सुळेंना टोला

संजय राऊत पुढे म्हणाले की, 'सुप्रिया सुळे याचं किंवा अन्य काही नेत्यांचं नाव तुम्ही वारंवार घेत आहात. त्यांना सत्तेची तहान नक्कीच लागली असेल. पण तहान लागल्यावर कोणी गटारातलं गढूळ पाणी पीत नाही. तहान जरी लागली असली तरी नक्की कोणत्या डबक्यात उडी मारायची किंवा महासागरात जरी उडी मारायचं ठरवलं तर त्या सागरात इतक्या लाटा उसळल्या आहेत, त्यात इतकी गर्दी आहे की, प्रत्येकाला आपलं स्थान शोधावं लागेल. जे गेलेले आहेत, तेच तिथे अस्तित्वासाठी धडपडत आहेत. नवी पिढी जाऊन काय करणार? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT