Vaishnavi Hagawane Case
Vaishnavi Hagawane Casex

Vaishnavi Hagawane : फरार निलेश चव्हाणला पकडून ठेवलय, त्याच्याजवळ दोन पिस्तूल...; पोलीस ठाण्यात फोन खणखणला, पण..

Vaishnavi Hagawane Case : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील सहावा आरोपी निलेश चव्हाण अजूनही फरार आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहेत. चव्हाणला आम्ही पकडून ठेवले आहे, असा फोन नांदेड सिटी पोलिसांना आला.
Published on

Vaishnavi Hagawane Case Updates : वैष्णवी हगवणे प्रकरणात हगवणे कुटुंबातील पाच जण पोलीस कोठडीत आहेत. काल (२८ मे) वैष्णवीचा नवरा, सासू, सासरे, दीर आणि नणंद यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने वैष्णवीच्या नवऱ्याला, सासूला, नणंदेला एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. तर सासरे आणि दीराला ३१ मे पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. वैष्णवी हगवणे प्रकरणातील सहावा आरोपी निलेश चव्हाण अद्याप फरार आहे.

फरार आरोपी निलेश चव्हाणला आम्ही पकडून ठेवल आहे, असा फोन नांदेड सिटी पोलिसांना आला होता. त्यानंतर लगेचच पोलिसांचा ताफा ज्या ठिकाणाहून फोन आला, तेथे पोहोचला. फोन करणाऱ्या व्यक्तीने 'आम्ही वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी चव्हाणला पकडून ठेवले आहे. त्याच्याजवळ दोन पिस्तूल आहेत. आम्ही त्याला मारहाण करुन गाडीच्या डिक्कीत ठेवले आहे' असे पोलिसांना सांगितले होते.

Vaishnavi Hagawane Case
Vaishnavi Hagawane : वैष्णवीसोबत चॅट करणारा 'तो' कोण? आरोपींच्या वकिलांनी दिली मोठी माहिती

फोन आलेल्या ठिकाणावर पोलीस पोहोचले, तेव्हा त्यांनी फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर फोन करणाऱ्याने पोलिसांना खोटी माहिती दिल्याचे उघड झाले. फरार आरोपीची माहिती पोलिसांना दिल्यावर पोलिसांकडून आपल्याला बक्षिसाची रक्कम मिळेल या हेतूने आरोपीने ११२ क्रमांकावर पोलिसांना फोन केला होता.

Vaishnavi Hagawane Case
MP: आणखी एक 'निर्भया'! प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंडी रॉड अन्...; गर्भाशय शरीराबाहेर आढळलं, नराधमांचं महिलेसोबत अमानवी कृत्य

खोटी माहिती दिल्याबद्दल पोलिसांनी संतोष गायकवाड (वय ३३) याच्याविरुद्ध नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. निलेश चव्हाणची खोटी माहिती देऊन पैसे मिळवण्याचा आरोपीचा बेत होता. पानशेत रस्त्यावरील स्वागत हॉटेल येथे आरोपीला पोलिसांनी गाठले. त्याच्याकडे निलेश चव्हाणची चौकशी केली, तेव्हा खोटा फोन केल्याचे आढळून आले.

Vaishnavi Hagawane Case
Vaishnavi Hagawane : वैष्णवीचे 'त्या' व्यक्तीसोबतचे चॅट्स आम्ही व्हायरल केले असते...; आरोपींच्या वकिलांचे खळबळजनक वक्तव्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com