sanjay raut Saam Tv
मुंबई/पुणे

राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार, राऊतांचे मोठे विधान

...तर महाविकास आघाडी स्थापन झाली नसती; राऊतांचे खडेबोल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - शरद पवार (Sharad Pawar) यांनी मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिल्यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देखील यासंदर्भात एक दावा केला आहे. राज्यात मध्यावधी निवडणुका लागणार असे मोठे वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले आहे. ते दिल्लीत बोलत होते. हे कायदेशीर दिशेच्या लढाईने सुरु राहील.

आम्ही सुद्धा तयारीला लागलो आहोत. पण जे शरद पवार म्हणतं आहेत किंवा इतर काही नेत्यांच्या अनुभवातून आम्ही सगळे जे अभ्यास करत आहे त्यावरून महाराष्ट्राला नक्कीच मध्यावधी निवडणुकीला सामोरं जावं लागेल. कदाचित गुजरातबरोबरसुद्धा या निवडणूक होणार अशी माझी माहिती आहे. म्हणून ही तात्पुरती व्यवस्था भाजपनं केली आहे. अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.

हे देखील पाहा -

भाजपचे 106 आमदार असताना सुद्धा आज त्यांनी दुय्यम भूमिका घेतली आहे. अशी व्यवस्था 2019 ला केली असती तर महाविकास आघाडीच झाली नसती. त्यावेळीही आम्हाला डावललं. त्यांचा हेतू शिवसेनेला फोडणं आणि मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणं असाच आहे, असं देखील राऊत म्हणाले.

तसेच शिवसेनेला तोडण्याची भाषा करणाऱ्यांना संजय राऊत यांनी चांगलाच सुनावलं आहे. शिवसेना म्हणजे युक्रेन नाही. असा कोणताही गट कुणी ताब्यात घेऊ शकत नाही. विधिमंडळात जरी शिवसेना कमजोर झाली असेल पण राज्यात शिवसेना आजही मजबूतच आहे असं राऊतांनी ठामपणे सांगितलं.

गटनेतापद आणि व्हिपच्या मुद्द्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, पक्षाच्या विरुद्ध कारवाई केली म्हणून शरद यादव यांंचं राज्यसभेतून निलंबन करण्यात आलं. कायदा समान असेल तर एका ठिकाणी एक न्याय दुसऱ्या ठिकाणी दुसरा न्याय का? असा सवाल राऊतांनी यावेळी केला. याला मी संसदीय लोकशाही मानत नाही. महाराष्ट्रात हेच सुरु आहे. झिरवाळ यांनी दिलेला निर्णय नवीन अध्यक्षांनी बदलला. ही राजकीय चढाओढ आहे असे देखील ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अचलपुरात बच्चू कडूंना मोठा धक्का; भाजपचे प्रवीण तायडे विजयी

UdyanRaje Bhosle News : उदयन राजेंची शरद पवारांवर विखारी टीका, पाहा Video

Viral Video: बापरे! खोल विहिरीत महिलांनी घेतला झोका; VIDEO व्हायरल होताच नेटकरी झाले हैराण

Health Diet: तुमच्या रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असणे महत्वाचे आहे? जाणून घ्या फायदे

Jharkhand Assembly Election Result: महाराष्ट्रात सेंच्युरी करणाऱ्या भाजपचा झारखंडमध्ये का झाला पराभव; काय आहेत कारण?

SCROLL FOR NEXT