Sanjay Raut Latest News saam tv
मुंबई/पुणे

सुप्रीम कोर्ट हे कुणाच्या खिश्यात राहू शकत नाही; संजय राऊतांचा हल्लाबोल

शिवसेना आणि शिंदे गटाच्या भवितव्याचा फैसला आज सर्वोच्च न्यायालयात होणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्यात बेकायदेशीर सरकार लादले आहे, त्यासाठी विधीमंडळाचा, राजभवनाचा वापर केला. याविरोधात शिवसेना कोर्टात पोहोचली आहे. या देशात लोकशाही आहे की नाही. याचा फैसला या निमित्ताने लागेल संपूर्ण देश सर्वाच्च न्यायालयाकडे अपेक्षेने पाहत आहे. पण सर्वाच्च न्यायालय आमच्या खिशात आहे, निकाल आमच्या बाजूने लागेल अशी वक्तव्य समोरच्या बाजुने केली जात आहेत, त्यामुळे लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आहे, असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले.

शिवसेना आणि शिंदे गटाच्या भवितव्याचा फैसला आज सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. या पर्श्वभूमीवर काल शिंदे गटातील नेत्यांनी हा निकाल आमच्याच बाजूने लागेल असं वक्तव्य केले होते, या वक्तव्याला आज संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिले.

सर्वोच्च न्यायालय निर्णय देईल आमचा विश्वास आहे, संविधानानुसार हे सरकार नाही. देशात लोकशाही आहे की नाही की त्याची ही हत्या झाली याचा निकाल येईल. काही लोक म्हणतात निकाल आमच्या बाजूने लागेल, न्यायालय त्यांचा गुलाम आहे का, असं सवालही राऊत (Sanjay Raut) यांनी केला.

शरद पवार यांची एक भूमिका आहे. फक्त त्यांनी एवढंच असं म्हटलंय की, आमच्यासोबत चर्चा झाली नाही. पण मुळात कॅबिनेटमध्ये तिन्ही पक्ष बसले होते. त्यावेळी तिघांनाही मिळून औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा निर्णय घेतला होता, असंही राऊतांनी (Sanjay Raut) स्पष्ट केले.

आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेला मोठा पाठिंबा मिळत आहे. ग्रास लेव्हलचे कार्यकर्ते अजूनही शिवसेनेसोबत आहेत. हे यावरुन दिसत आहे. शिवसेना शिवसेना आहे कोणी बाहेर जात असतील बाळासाहेब ठाकरे यांचे नाव त्यांनी घेऊ नये, असंही संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून गेवराई नगर परिषदेसाठी पहिला उमेदवार जाहीर

Mahabharat: महाभारताचे पुरावे सापडले? कुरुक्षेत्रात सापडला रथ, महाकाय गदा?

Maharashtra Politics: सुजय विखेंनी दिले वडिलांना राजकारणाचे धडे,'विरोधकांपेक्षा गाडीत बसणाऱ्यांपासून सावध राहा'

Buldhana Crime: सकाळी-सकाळी डोकं फिरलं, सपासप कुऱ्हाडीने वार करत आई-बाबाला संपवलं; नंतर स्वतःला लावला फास

Maharashtra Politics: भाजप कुबड्या काढणार? भाजप अजितदादा-शिंदेंना रोखणार?

SCROLL FOR NEXT