मुंबई: शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी करत राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री पदाची एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री पदाची भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. बहुमत चाचणी दरम्यानही या ४० आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. पण शिवसेनेतील १५ आमदारांनी शेवटपर्यंत बंडखोरी न करता शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला. आता या १५ आमदारांना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भावनिक पत्र लिहिले आहे. या पत्रात संकटाच्या काळात साथ दिल्याबद्दल निष्ठावान शिवसेनेच्या आमदारांना धन्यवाद व्यक्त केले आहे. (Uddhav Thackeray Latest News)
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर निष्ठा दाखवत संकटाच्या काळात साथ दिल्याबद्दल निष्ठावान शिवसेनेच्या १५ आमदारांना धन्यवाद व्यक्त करणारे भावनिक पत्र पाठवले आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. शिवसेनेचे राहिलेले आमदारही शिंदे गटाला मिळतील अशा राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होत्या.
आज सुप्रीम कोर्टात शिवसेना (ShivSena) ठाकरे गट विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना गट यांच्या एकमेकांवरच्या याचिकांवर निकाल जाहीर होणार आहे. निकालाचा निर्णय येण्यापूर्वीच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासोबत राहीलेल्या १५ निष्ठावान शिवसेना आमदारांना भावनिक पत्र लिहीले आहे.
आईच्या दूधाशी बेईमानी करू नका हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा मंत्र जपत तुम्ही शिवसेनेसोबत रहात निष्ठेचे पालन केले आहे. कोणत्याही धमक्या आणि प्रलोभनांना बळी न पडता आपण एकनिष्ठ राहिलात आणि शिवसेनेला बळ दिले. आई जगदंबा तुम्हास निरोगी आयुष्य देओ हीच प्रार्थना, अस या पत्रात म्हटले आहे. (Uddhav Thackeray Latest News)
शिवसेना हा आपला परिवार आहे. आजही वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आपले सर्वस्व आहेत. निष्ठा व अस्मितेची महती शिवसेना प्रमुखांनी आपल्याला शिकवली. आईच्या दुधाशी बेईमानी करु नका, हा त्यांचा निष्ठेबाबतचा मंत्र आजही सगळ्यांना सन्माननीय. शिवसेनेचे आमदार म्हणून आपण त्या निष्ठेचे पालन केलेत व बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे पाईक आहात हे दाखवून दिले. कोणत्याही धमक्या आणि प्रलोभनांना बळी न पडता आपण एकनिष्ठ राहिलात आणि शिवसेनेला बळ दिले. आपल्या या भूमिकेनेमुळे महाराष्ट्राला अभिमान वाटला. व शिवसेनेस बळ मिळाले. आई जगदंबा तुम्हास निरोगी आयुष्य देओ. अस या पत्रात म्हटले आहे. (Uddhav Thackeray Latest News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.