Sanjay Raut Latest News saam tv
मुंबई/पुणे

बंडखोर उद्या म्हणतील बाळासाहेबांना आम्हीच सेनेत आणलं; संजय राऊतांचा हल्लाबोल

फुटीर गटाला चंद्रावर देखील ताबा हवा आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी शिंदे गटाला लगावला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : लोकसभा अध्यक्षांनी घाईने राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांच्या गटनेते पदाला मान्यता दिली. आम्ही दिलेल्या पत्राला अजुनही उत्तर दिलेले नाही. आज सर्वाच्च न्यायालयात आम्हा सर्वांना न्याय मिळेल, याची आम्हाला खात्री आहे. ज्या पध्दतीने फुटीर गटाच्या गटनेते पदाला मान्यता दिली जाते. ती चुकीची आहे. फुटीर गटाला चंद्रावर देखील ताबा हवा आहे, असा टोलाही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाला लगावला.

आमचे लक्ष आहे. आज सुनावणी सुरु होईल. आमच्या सर्वोच्च न्यायालात आम्हाला न्याय मिळेल अशी आम्हाला खात्री आहे. त्यांना जी काही लढाई लढायची आहे. ती त्यांना लढू ती द्या. ते आमचे सहकारी होते. आजही सहकारी होते. प्रत्येकाचे वेगळे कारण आहे. प्रत्येकाला ते कारण माहित आहे, असंही राऊत म्हणाले.

भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी २०१९ च्या युबद्दल काल केलेल्या विधानावर बोलताना राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी केलेले विधान दानवे यांनी ऐकले आहे का, दानवे यांना याबाबतची एक क्लीप मी पाठवतो. ते इथे माझ्या शेजारी राहायला आहेत. २०१४ ते २०१९ मध्ये झालेल्या घटनेला कोण जबाबदार कोण आहेत. रावसाहेब दानवे हे पुढच्या टर्ममध्ये निवडून येतील का, त्यामुळे त्यांना हे बोलण्याची मजबूरी आहे, असा टोलाही संजय राऊत यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर लगावला.

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावलं आहे. त्यामुळे ईडीने संजय राऊतांना (Sanjay Raut ) आज बुधवारी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. यावर आज शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली. मला ईडीचे (ED) समन्स येणार याची कल्पना होती. अधिवेशन झाल्यानंतर मी ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाणार आहे. माझे वकील पुढची तारीख देण्यासाठी ईडीकडे विनंती करतील अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

September Grah Gochar: सप्टेंबरमध्ये बुध, मंगल आणि शुक्र ग्रह बदलणार चाल; 'या' 3 राशींचं नशीब चमकण्याची शक्यता

Ganeshotsav Bus : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, गणेशभक्तांच्या बसचा आधी टायर फुटला; नंतर पेट घेतला, क्षणात...

Xiaomi Redmi Note 15 Pro लाँच, प्रीमियम कॅमेरा आणि दमदार फिचर्स, किंमत किती?

Budh Gochar 2025: गणेश चतुर्थीपासून चमकणार 'या' २ राशींचं नशीब; बुध ग्रहाच्या गोचरमुळे बसणार धन

SCROLL FOR NEXT