Sanjay Raut Latest News saam tv
मुंबई/पुणे

मोठी बातमी! संजय राऊतांच्या अडचणी वाढल्या; ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

शिवसेना नेते संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी देण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी देण्यात आली आहे. ईडीने अगोदर ८ दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती, पण कोर्टाने तीन दिवसांची ईडी कोठडी दिली आहे.

काल खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी ईडीने धाड टाकली. ईडीने सलग ९ तास चौकशी केली. या चौकशीनंतर राऊत यांची रात्री १ च्या दरम्यान त्यांना अटक केली. सकाळी मेडिकल तपासणी करुन राऊत यांना कोर्टात आणले. आज कोर्टात सुनावणी झाली. (Sanjay Raut Latest News)

ईडीने (ED) सुरुवातीला आठ दिवसांची ईडी कोठडीची मागणी केली होती, पण कोर्टाने चौकशीसाठी आठ दिवसांची गरज नाही म्हणत तीन दिवसांची कोठडी दिली आहे. संजय राऊत हार्ट पेशंट आहेत ते तपासाला मदत करत आहेत, असा युक्तीवाद राऊत यांच्या वकीलांनी केला. ४ तारखेला पुन्हा संजय राऊत यांना ईडीच्या कोर्टासमोर उभे केले जाणार आहे.

ईडी (ED) कोठडीत राऊत यांना घरचे जेवन देण्याची परवानगी कोर्टाने दिली आहे. संजय राऊत यांना प्रवीण राऊत यांच्याकडून पैसे कसे मिळाले, त्या पैशाचा त्यांनी कसा वापर केला. तसेच प्रविण राऊत यांचा महिन्याचा खर्च, विमानाची तिकिटे संजय राऊत काढून द्यायचे असा आरोप ईडीने केला.

संजय राऊत यांच्या वकिलांनी हे आरोप फेटाळले. राजकारण करुन संजय राऊत यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा युक्तीवाद राऊत यांच्या वकीलांनी केला. तसेच यावेळी कोर्टाने यावर ३ दिवसांची कोठडी दिली, या चौकशीसाठी आठ दिवसांची कोठडीची आवश्यक्ता नाही, असं कोर्टाने म्हटले. (ED Latest News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : लोकसभेत घटनादुरूस्ती विधेयक मांडले, विरोधकांचा गोंधळ

Pune News : पुणेकरांना मोठा दिलासा; सिंहगड रोडवरील नवा उड्डाणपूल लवकरच होणार सुरू

Shocking: शाळेत हत्येचा थरार! नववीच्या विद्यार्थ्याने दहावीच्या विद्यार्थ्याला चाकूने भोसकलं, जमावाकडून शाळेची तोडफोड

Chandrabhaga River Flood : पंढरपुरात ४०० नागरिकांचे करणार स्थलांतर; चंद्रभागेच्या पुराने कुटुंब बाधित

Bail Pola 2025: यंदा बैलपोळा सण कधी आहे? जाणून घ्या तारीख आणि महत्व

SCROLL FOR NEXT