निवृत्ती बाबर
Sanjay raut News: खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. खासदार संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्या विरोधात मुलुंड न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. संजय राऊत यांच्या अब्रुनुकसानीच्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)
नारायण राणे यांना भांडुप येथील आयोजित कार्यक्रमात केलेले विधाने महागात पडली आहेत. 'मी शिवसेनेत असताना संजय राऊत यांना राज्यसभा निवडणुकीत निवडून आणण्यासाठी मी खर्च केला. संजय राऊत यांचे मतदार यादीत नावही नव्हते, अशी विधाने नारायण राणे यांनी भांडुप येथे आयोजित एका कार्यक्रमात केली होती. नारायण राणे यांच्या या विधानानंतर राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.
संजय राऊत यांनी याप्रकरणी नारायण राणे यांना फेब्रुवारी महिन्यात कायदेशीर नोटीस पाठवली होती.नारायण राणे यांनी पुराव्यानिशी त्यांचे दावे सिद्ध करावेत असे नोटीसीत म्हटले होते. मात्र, नारायण राणे यांनी या नोटीसीला उत्तर न दिल्याने संजय राऊत यांनी त्यांना आता आपल्या मानहानी प्रकरणी न्यायालयात खेचले आहे.
नारायण राणे काय म्हणाले होते?
नारायण राणे (Narayan Rane) यांनी भांडुपमधील एका कार्यक्रमात खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली होती. 'शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या म्हणण्यावरून संजय राऊत यांना खासदार केलं होतं. संजय राऊत यांच्या विरोधात उद्धव ठाकरे अन्य दुसऱ्या उमेदवारासाठी कार्यालयात बसले होते'.
' संजय राऊत यांना खासदार करणं माझं पाप आहे. मी शिवसेनेत असताना संजय राऊत यांना राज्यसभा निवडणुकीत निवडून आणण्यासाठी मी खर्च केला. संजय राऊत (Sanjay Raut) यांचे मतदार यादीत नावही नव्हते, असे राणे म्हणाले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.