Sanjay Raut on Eknath Shinde
Sanjay Raut on Eknath Shinde Saam tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut on Eknath Shinde: 'महाराष्ट्र ही गद्दारी लक्षात ठेवील'; संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल

Vishal Gangurde

Sanjay Raut News: कर्नाटकात निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी कर्नाटकात सभांचा धडाका लावला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील कर्नाटकाच्या दौऱ्यावर गेले आहेत. मात्र, यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)

कर्नाटकात निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. काँग्रेस, भाजप आदी पक्षांनी निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली आहे. अनेक पक्षांचे राजकीय नेते कर्नाटकाच्या दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील प्रचाराच्या कर्नाटकाच्या दौऱ्यावर आहेत. यावरून संजय राऊत निशाणा साधला आहे.

संजय राऊत म्हणाले, ' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्नाटकात भारतीय जनता पक्षाच्या प्रचारास गेले आहेत.शिवसेना आमचीच.. बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आम्हीच असा डांगोरा ते रोज पिटत आहेत. आता काय? कर्नाटकचे मुख्यमंत्री बॉम्माई म्हणतात महाराष्ट्र एकीकरण समितीचे लोकं उचापती आहेत त्यांना आम्ही धडा शिकवू..आणि शिंदे त्याच बॉम्माईच्या पखाली वाहत आहेत'.

'शिंदे व त्यांची टोळी सीमा भागात फिरकली नाही.उलट एकीकरण समितीच्या विरोधातील भाजपा उमेदवारांना खोके पाठवून मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खुपसला. सीमा भागातील एकीकरण समितीचे उमेदवार पराभूत व्हावेत म्हणून शिंदे यांनी जोर लावला आहे.नकली शिवसेना! ढोंगी हिंदूत्व! हे तर महाराष्ट्राचे वैरी. बाळासाहेबांनी या कृत्या बद्दल शिंदे यांची शिवसेनेतून हकालपट्टीच केली असती.. एकशे पाच हुतात्म्यांशी ही बेइमानी आहे..महाराष्ट्र ही गद्दारी लक्षात ठेवील, असेही राऊत पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

AC Tips: उन्हाळ्यात ऐसी वापरताय? सेटिंग करताना 'या' चूका टाळा नाहितर...

SRH vs PBKS: हैदराबादविरुद्धच्या सामन्याआधी पंजाबने कर्णधार बदलला; या सामन्यासाठी अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

Chiplun Heavy Rain : भर उन्हाळ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; चिपळून, अडरे भागात नद्या झाल्या प्रवाहित

Perfect Apple : बाहेरून मस्त दिसणारा सफरचंद आतून खराब निघतो; वाचा गोड आणि टेस्टी Apple ओळखण्याच्या टिप्स

Tomato Side Effects: या लोकांनी टोमॅटो खाणे आरोग्यासाठी घातक

SCROLL FOR NEXT