Sanjay Raut  Saam tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut on Kangana Ranaut : काही लोक मत देतात, काही कानाखाली लगावतात; संजय राऊतांचा कंगना रणौत यांना टोला

Sanjay Raut Latest News : संजय राऊत यांनी भाजप खासदार कंगना राऊत यांना झालेल्या मारहाणीवर भाष्य केलं. काही लोक मत देतात, तर काही लोक कानाखाली लगावतात, असं म्हणत संजय राऊत यांनी कंगना यांच्यावर टीका केली.

Vishal Gangurde

मयूर राणे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : भाजप खासदार कंगना रणौत यांना गुरुवारी चंदीगड विमानतळावर CISF महिला कॉन्स्टेबलने कानशिलात लगावली. यानंतर या CISF महिला कॉन्स्टेबलच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भाजप खासदार कंगना यांना कानशिलात लगावल्यानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या घटनेवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'काही लोक मत देतात, काही लोक कानाखाली लगावतात, असं म्हणत संजय राऊत यांनी कंगना रणौत यांना टोला लगावला.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यावर टीका केली. तसेच कंगना रणौतवर भाष्य केलं. संजय राऊत म्हणाले, 'काही लोक मत देतात, काही कानाखाली लगावतात. मला माहिती नेमकं काय झालं आहे. मी पाहिल्यानंतर यावर बोलेल'.

'ती कॉन्स्टेबल म्हणत असेल, तिची आई शेतकरी आंदोलनात सहभागी होती. जर तिच्या आईविरोधात कोणी चुकीचं म्हटलं असेल तर राग आला असेल. मोदी म्हणत असेल, कायद्याचं राज्य आहे. तर कोणी कायदा हातात घ्यायला नको. मला कंगनाविषयी दु:ख वाटतंय. कंगना आता खासदार आहे. देशात शेतकऱ्यांचा सन्मान झाला पाहिजे, असे ते म्हणाले.

महायुतीमधील नेत्यांच्या दिल्लीवारीवर बोलताना राऊत म्हणाले, 'तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. महाराष्ट्रातून कोणीही जावो, त्यांच्या पक्षातील नेत्यांना भेटावं. त्यावर आम्ही कसं बोलणार, त्यांच्या घडामोडी दिल्ली आणि महाराष्ट्रात सुरु आहेत. राज्यात भाजपचा दारुण पराभव झाला आहे. पराभव झाल्यामुले पक्षाच्या नेत्याला दिल्लीत बोलावलं जातं. महाराष्ट्रात आपण काय करायला गेलो, त्याचं काय झालं याच्यावर चिंतन होईल, हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: 22 देशातून 18 हजार किलोमीटरचा प्रवास 70 दिवसात करत पंढरीची वारी पोहोचली लंडनला

Kasara waterfall: मुंबईपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहेत हे सुंदर धबधबे; One Day पिकनीक नक्की करा

Nagpur: गँगस्टरच्या पत्नीसोबत अफेअर, महिलेचा मृत्यू; इप्पा गँगच्या मनात वेगळाच संशय, 'टोपी'च्या शोधात ४० लोक

Maharashtra Population: महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे?

Raigad Politics : रायगडच्या वादाचा दुसरा अंक; राष्ट्रवादी भाजपमध्ये सुप्त संघर्ष

SCROLL FOR NEXT