Sanjay Raut News, Shivsena News in Marathi saam tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut: बंडखोरांना धुणी भांडीच करावी लागणार; संजय राऊतांचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले होते. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आता आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आज शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी बंडखोर नेत्यांवर टीका केली. (Sanjay Raut News in Marathi)

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, आपल्याच लोकांनी पाठित खंजीर खुपसला. न्यायालयाचा निकाल आल्यानंतर खुर्चिला चिटकून राहणे बरोबर नव्हते. म्हणून त्यांनी राजीनामा दिला. आज जी लोक आम्हाला दोष देत आहेत, त्यांना महाविकास आघाडी सरकार काळात चांगली खाती मिळाली. तेव्हा कुणीच काही बोलले नाही, आता काही ना काही कारणाने बाहेर पडायचे आहे, यासाठी दुसऱ्यांना आता का दोष देत आहात.(Shivsena News in Marathi)

आमचे हाडाचे शिवसैनिक तिकडे गेल्याचे आम्हाला दु:ख आहे, त्यांना सरकार पाडण्याचे जे कॉन्ट्रक्ट मिळाले होते, ते त्यांनी पूर्ण केले. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, पण आता बंडखोरांना दुसऱ्यांची धुणी भांडी करावी लागणार आहेत, असा टोलाही संजय राऊत यांनी बंडखोर नेत्यांना लगावला.

येणाऱ्या नवीन सरकारने राज्याच्या हितासाठी काम करावे. आम्ही चांगल्या विरोधी पक्षनेत्याचे काम करतो. आज मी शिवसेनेचे मीठ खातोय मी उद्या पळून जाणार नाही. मी उद्या ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाणार आहे. कोणत्याही प्रकारची माझ्यावर कारवाई झाली तरीही मी सामोरे जाणार आहे, असंही संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

अडीच वर्षापूर्वी व्यवस्थित वाटाघाटी केल्या असत्यातर आता ही परिस्थिती आली नसती. ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे, ही शिवसेना आम्ही मोठी करणार आहे. दीपक केसरकर आदल्या दिवशी आमच्यासोबत चहा पीत बसले होते, आणि दुसऱ्या दिवशी परत गेले. आम्ही सगळ्यांनी मिळून राज्याला शिवसेनेचा मुख्यमंत्री दिला. यासाठी मी प्रतिष्ठा पणाला लावली असेलतर मी जबाबदारी घेतो. तुम्ही आता शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार आहात का, असा सवालही राऊत यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism: नैसर्गिक सुंदरता अन् शांत वातावरण; महाराष्ट्रातील 'या' सुंदर ठिकाणी कधी गेलात का? एकदा भेट द्याच

Maharashtra Live News Update: : परभणीच्या जिंतूरमध्ये बंजारा समाजाचे आमरण उपोषण

संतापजनक! गोड बोलून फ्लॅटमध्ये नेलं अन्...; वाढदिवसाच्या रात्री महिलेसोबत घडलं भयंकर

Beed News: बीडमध्ये दोन गट आमने-सामने; एका गटाकडून वाल्मिक कराडच्या नावाने घोषणाबाजी|VIDEO

Beed News : बीडमध्ये पोलीस अॅक्शन मोडमध्ये; बीडमधील नागरिकांना केलं मोठं आवाहन

SCROLL FOR NEXT