Sanjay Raut :  Saam tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut : आम्हाला भाड्याने लोक आणावे लागत नाहीत; संजय राऊत यांचा राज ठाकरे यांच्या मनसेला टोला

Sanjay Raut on Raj Thackeray : शिवाजी मैदानाच्या परवानगीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आम्हाला भाड्याने लोक आणावे लागत नाहीत, असा अप्रत्यक्ष टोला मनसेला लगावला आहे.

Vishal Gangurde

मयूर राणे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीदरम्यान १७ मे रोजी दादरच्या शिवाजी पार्क सभा घेण्याची परवानगी मनसेला मिळाली. या मैदानात सभा घेण्यासाठी ठाकरे गट देखील आग्रही होता. मात्र, १७ मे रोजी राज ठाकरे यांच्या मनसेला सभा घेण्याची परवानगी नगरविकास विभागाकडून मिळाली. या परवानगीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आम्हाला भाड्याने लोक आणावे लागत नाहीत, असा अप्रत्यक्ष टोला मनसेला लगावला आहे.

शिवाजी पार्क मैदान परवानगीवरून संजय राऊत म्हणाले, 'या प्रकाराला तर सुडाचं राजकारण म्हणतात. सत्तेचा गैरवापर म्हणतात. लफंगेगिरी आणि भय म्हणतात. आम्ही महाराष्ट्रात आणि मुंबईत आम्ही कुठेही सभा घेतली तरी, आमच्या सभेला लोक येतात. आम्हाला भाड्याने लोक आणावी लागत नाहीत'.

राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्या एकत्र सभेच्या प्रश्नावर राऊतांनी भाष्य केलं. 'तुम्ही त्यांचा जुना टिझर दाखवा. पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना महाराष्ट्रात पाय ठेऊ देऊ नका, हे कोण म्हणाल होतं, असा सवाल राऊतांनी केला.

रविंद्र वायकर यांच्या आरोपावर बोलताना राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्यांनी जेलमध्ये जाण्याची हिंमत दाखवली नाही. आम्ही तुरुंगात गेलो. या सर्व लोकांची कोणत्याही स्वातंत्र्य चळवळीतील लढ्यातील क्रांतीकारांचे नाव घ्यायची पात्रता नाही. ते शरणागत झालेला आहात. आपण गुलामी पत्करलेली आहे. त्यामुळे त्या पद्धतीनेच बोललं पाहिजे. त्या पद्धतीने जगलं पाहिजे, उगाच छात्या फुगवून बोलू नका'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLA car accident : बुलढाण्यात आमदाराच्या कारचा भीषण अपघात, २५ वर्षाचा तरूण कोमात

Navratri Rules: नवरात्रीत कांदा-लसूण का खाऊ नये? जाणून घ्या कारण

चिकन खाल्लं, बेसीन धुण्यावरून राडा; MPSC करणाऱ्या मुलींची हाणामारी, ४ जणींनी रूम पार्टनरला भींतीवर आदळून चोपलं

Maharashtra Live News Update: एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी धनगर समाज बांधवांचे बीडमध्ये आंदोलन

Momos Recipe: मैदा नाही तर गव्हापासून बनवा पौष्टिक मोमोज, सोपी रेसिपी वाचा

SCROLL FOR NEXT