Sanjay Raut Expulsion Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut News : संजय राऊत लोकसभा निवडणूक लढणार? ठाकरे गटाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर

Sanjay Raut Contest Loksabha election : ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढू शकतात.

प्रविण वाकचौरे

Mumbai News : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आमच्या जीवावर खासदार आहेत, असं शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्यांनी अनेकदा बोलून दाखवलं आहे. मात्र या सर्वांना चोख उत्तर देण्यासाठी संजय राऊत लोकसभा निवडणुकीच्या रिंगण्यात उतरण्याची शक्यता आहे.

संजय राऊत लोकसभा निवडणूक (Loksabha Election 2024) लढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढू शकतात. ईशान्य मुंबई मतदारसंघात सध्या भाजपचा खासदार आहे. भाजपचे मनोज कोटक सध्या तिथून खासदार आहेत. (Political News)

संजय राऊत यांनी लोकसभा निवडणूक लढावी अशी पक्षाची भूमिका असल्याचं समजतंय. संजय राऊत सध्या राज्यसभेचे खासदार आहे. ते चौथ्यांदा राज्यसभेवर गेले आहेत. मात्र आता ते लोकसभेच्या निवडणुकीच्या मैदानात पहिल्यांदा उतरण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

संजय राऊत लोकसभेच्या रिंगणात उतरले तर ईशान्य मुंबईत भाजपचे मनोज कोटक आणि संजय राऊत असा सामना होऊ शकतो. या मतदारसंघात किरीट सोमय्या यांचंही प्राबल्य आहे. त्यामुळे थेट किरीट सोमय्या देखील संजय राऊतांच्या विरोधात असतील.

ठाकरे गटासाठी हा निर्णय योग्य की अयोग्य?

मात्र शिवसेना ठाकरे गटाचा विचार केला तर संजय राऊत फायरब्रँड नेते आहेत. अडचणीच्या काळात पक्षाची बाजू त्यांनी रोखठोकपणे मांडताना दिसले. ते पक्षाचे नेते असल्याने त्यांच्यावर राजकीय रणनितीची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यात जर संजय राऊत पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीत उतरणार असतील तर त्यांना मतदारसंघातही जास्तीचं लक्ष द्यावं लागेल.

अशात एका मतदारसंघात ते अडकून पडले तर पक्षाकडे दुर्लक्ष होऊ शकतं. याचा फायदा महायुतीला होऊ शकतो. कठीण परीक्षेच्या काळात ठाकरे गटाला कदाचित परवडणारं नसेल, असं बोललं जातंय. मात्र सर्व बाजूंचा विचार करुन ठाकरे गट आणि इंडिया आघाडी काय निर्णय घेईल, याकडे सर्वांचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातल्या ४ मतदारसंघात भाजप आघाडीवर

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

SCROLL FOR NEXT