Chhagan Bhujbal News: मंत्री छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, ब्राह्मण समाजाची शिंदे सरकारकडे मागणी

Chhagan Bhujbal News: छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी महंत सुधीरदास पुजारी यांनी केली आहे.
Minister chhagan bhujbal Problems increased sudhir das maharaj Big demand Cm Eknath Shinde
Minister chhagan bhujbal Problems increased sudhir das maharaj Big demand Cm Eknath Shinde Saam TV

Chhagan Bhujbal Latest News: राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एका संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना ब्राह्मण समाजाबद्दल विधान केलं. ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी अशी नावे ठेवत नाहीत, असं छगन भुजबळ म्हणाले. त्यांच्या या विधानावरून चांगलाच वाद निर्माण झाला असून ब्राह्मण समाज आक्रमक झाला आहे. (Latest Marathi News)

Minister chhagan bhujbal Problems increased sudhir das maharaj Big demand Cm Eknath Shinde
CWC List: काँग्रेस वर्किंग कमिटीची यादी अखेर जाहीर; महाराष्ट्रातून अशोक चव्हाणांसह हंडोरे यांचीही वर्णी

अशातच छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी महंत सुधीरदास पुजारी यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांनी छगन भुजबळ यांना समज द्यावी, यापुढे जर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी अशी विधाने केली, तर त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, असंही महंत सुधीरदास पुजारी म्हणाले.

दरम्यान, ब्राह्मण समाजाबद्दल वक्तव्य केल्यानंतर भुजबळ यांना कानाखाली मारण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच कानाखाली देणाऱ्याला १ लाख रुपये घोषणा करण्यात आली होती. या धमकीनंतर पोलीस विभागाकडून त्यांच्या सुरक्षेत करण्यात आली आहे.

Minister chhagan bhujbal Problems increased sudhir das maharaj Big demand Cm Eknath Shinde
CWC List: काँग्रेस वर्किंग कमिटीची यादी अखेर जाहीर; महाराष्ट्रातून अशोक चव्हाणांसह हंडोरे यांचीही वर्णी

दुसरीकडे मी हे यापूर्वीही बोललो असून, आजही बोलत आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झालो म्हणून माझी भूमिका बदलणार नाही,' असे राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं आहे.

छगन भुजबळ काय म्हणाले होते?

ब्राह्मण समाजात शिवाजी, संभाजी अशी नावे ठेवत नाहीत, अशा शब्दांत मंत्री छगन भुजबळ यांनी वादग्रस्त विधान करणारे संभाजी भिडे यांच्यावर निशाणा साधला आहे. एका कार्यक्रम बोलताना भुजबळ यांनी हे विधान केलं होतं. त्याचबरोबर आम्ही कुठेही गेलो, तरी शाहू-फुले-आंबेडकरांचा वारसा अजिबात सोडणार नाही, असेही मंत्री भुजबळ म्हणाले होते.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com