varsha bungalow Saam tv
मुंबई/पुणे

Varsha Bungalow : 'मंतरलेली शिंगे वर्षात गाडली'; मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासात काळ्या जादूचं वावटळ? पाहा स्पेशल रिपोर्ट

Varsha bungalow Latest News : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर काळी जादू होत असल्याचा आरोपांची राळ शांत होत नाही तोवर वर्षात मंतरलेल्या रेड्याचे शिंगं पुरल्याचा खळबळजनक दावा करण्यात आलाय. हा रेडा नेमका कुठं मंतरलेला होता आणि कुणी पुरला त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

Bharat Mohalkar

ग्रामीण भागात अंधश्रद्धेतून काळी जादू, पशूबळी, जादूटोण्याच्या घटना अनेकदा चर्चेत येत असतात.. मात्र आता थेट मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेला वर्षा बंगला जादूटोण्याच्या चर्चेमुळे वादात सापडलाय...त्यातच मुख्यमंत्रिपदाची शपथेला 2 महिने पूर्ण झाल्यानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा बंगल्यावर राहायला गेले नाहीत. हाच धागा पकडून संजय राऊतांनी वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये कामाख्या देवीला कापलेल्या रेड्याची मंतरलेली शिंगं पुरल्याचा दावा करुन आगीत तेल ओतलंय... तर राऊतांना अशा गोष्टींचा मोठा अनुभव असल्याचा पलटवार शिंदेंनी केलाय..

'सीएमपद दुसऱ्याकडे टिकू नये म्हणून वर्षात रेड्याची शिंगं पुरले, असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 'जादूटोण्याचा त्यांना मोठा अनुभव आहे, अशी प्रतिक्रिया शिंदेंनी दिली. 'तर शिंगे गाडली असतील तर बाहेर काढा, असं म्हणत छगन भुजबळांनी या प्रकारावर उपहासात्मक प्रतिक्रिया दिलीय.

सामना चित्रपटात मारुती कांबळेचं काय झालं? कटप्पाने बाहुबलीला का मारलं? या प्रश्नांप्रमाणेच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी राहायला का जात नाहीत? या नव्या प्रश्नावर राज्यात चर्चा रंगलीय.. त्यामुळे राऊतांच्या दाव्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर रेड्याची शिंगे पुरली आहेत का? आणि पुरोगामी महाराष्ट्रात सुरु असलेली जादू टोण्याची चर्चा खोडून काढण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात याकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bareli Protest : बरेलीत नमाजावेळी मोठा गोंधळ, शेकडो आंदोलक रत्यावर उतरले; पोलिसांचा लाठीचार्ज

Vastu Tips Of Lighting Diya: घरात या दिशेला ठेवू नये पेटता दिवा, ओढवेल मोठं संकट

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

SCROLL FOR NEXT