मयूर राणे, साम टीव्ही प्रतिनिधी
मुंबई : मुंबईत काल पंतप्रधान मोदींची जाहीर सभा झाली. या सभेच्या आधी पंतप्रधान मोदींनी ईशान्य मुंबई मतदारसंघात रोड शो केला. या रोड शोदरम्यान महायुतीने शक्तिप्रदर्शन केलं होता. आता रोड शोवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. 'मुंबई महापालिकेने पंतप्रधान मोदींच्या रोड शोसाठी ३ कोटी ५६ लाख खर्च केले आहे, असा मोठा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी मुंबई माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप आणि सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले. राऊत म्हणाले, 'भाजप, शिंदे गट, अजित पवार गटाचे मुख्य हत्या या लोकशाहीत पैसे वाटणे आणि धमक्या देणे हेच आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमधून १९ पैशांच्या बॅग कशा उतरवल्या, ते मी दाखवल्या त्यानंतर दोन दिवसानंतर नाटक करून त्यांचे कपडे दाखवले. प्रत्येक मतदारसंघात 25 कोटी रुपये यांनी पोचवले आहेत. पोलीस संरक्षणाममध्ये पैशांचं वाटप होत आहे. काल मुलुंडला शिवसैनिकांनी हा प्रकार पकडला'.
'पंतप्रधान मोदींवर आरोप करतान राऊत म्हणाले, 'नरेंद्र मोदी हे तीन दिवसापूर्वी मुंबईत होते. काल देखील मुंबईत होते. मुंबईत त्यांनी रोड शो केला. भारतीय जनता पक्षाचा खासगी प्रचाराचा कार्यक्रम होता. नरेंद्र मोदी यांच्या रोड शोचा खर्च त्यांच्या पैशांतून व्हायला पाहिजे होता. भाजपाचा पैशातून व्हायला पाहिजे होता. हा खर्च मुंबई महानगरपालिकेने केला आहे. पालिकेने ३ कोटी ५६ लाख रुपये खर्च केला आहे. हा आचारसंहितेचा संहितेचा भंग आहे'.
'नरेंद्र मोदी यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला पाहिजे. मुंबईकरांना वेठीस धरायचं नाही. तुम्ही मुंबईकरांच्या खिशावरती भार टाकत आहात. भाजपकडून ह पैसा वसूल केला पाहिजे. यांच्यावर निवडणूक आयोगाने काय कारवाई केली,हे देखील सांगितलं पाहिजे, असे राऊत म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.