Maharashtra Politics 2024 : 'दक्षिण भारतात भाजपच्या १० जागाही येणार नाहीत'; आदित्य ठाकरेंचा भाजप, शिंदे गटावर हल्लाबोल

Lok Sabha Election 2024 : भाजपच्या पंकज मुंडेही बोलल्या आहेत की यांना संविधान बदलायचं म्हणून ४०० पार जागा हव्या आहेत. मात्र दक्षिण भारतात तर भाजपच्या 10 सीट पण येणार नाहीत, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.
Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024Saam Digital

पिंपळगावला मोदी आले असता शेतकऱ्यांना अटक केली, काय गरज होती?. मोदी, शिंदे गटाची सभा असेल तर शेतकऱ्यांना गप्प करण्याचा प्रयत्न होतोय. भाजपच्या पंकज मुंडेही बोलल्या आहेत की यांना संविधान बदलायचं म्हणून ४०० पार जागा हव्या आहेत. मात्र दक्षिण भारतात तर भाजपच्या 10 सीट पण येणार नाहीत, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.

आपल्यासाठी तडीपारीच्या नोटीसा काढतायत उद्या सर्वसामान्य नागरिकांसाठीही काढतील. दिल्लीत केजरीवालांना अटक केल्याने भाजपची तिथे परिस्थिती अवघड आहे, उत्तर प्रदेशात भाजप दहाच्या पुढे जात नाही काश्मीरमध्ये भाजप दोन जागा लढवत नाही.2014, 2019 ला भाजपसाठी आपण प्रचार केला, पण प्रत्येक ठिकाणी विश्वासघात झाला. जी भाजप दहा वर्षापासून आपलं सरकार म्हणून काम करतेय त्यांना कोणाला अटक करायची गरज काय ? राज्यात पहिल्या चार टप्प्यात महाविकास आघाडी सर्वाधिक जागा जिंकत आहे. राज्यात मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र 36 जिल्ह्यात आपल्याला काय मिळालय ? भाजपमुळे नुकसान झालंय.

आपल्या सरकारच्या काळात उद्धव ठाकरेंनी कर्जमुक्त केली. शेतकऱ्यांना अटक झाली का ? आपण अवकाळीची मदत केली ना ? आपण अन्नदाता म्हणून बघत होतो. गारपीट होउदे किंवा नुकसान यांच्या काळात कोणतीही मदत मिळत नाही. फडणवीस म्हणाले कर्जमुक्ती करू पण किती अटी शर्ती होत्या. दिल्लीत शेतकऱ्याबर यांनी गोळीबार केला, अशांना तुम्ही मतदान करणार का ? असा सवाल आदित्य ठाकरेंनी यावेळी केला.

Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024 : भुजबळ नाराज, महायुतीला टेंशन?; महाजनांची भुजबळ फार्मवर दीड तास चर्चा

आजचे युवक भाजपला विचारतायेत तुम्ही आमच्यासाठी काय केलं?. शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढल्या भाजपला ते दिसत नाही. गुजरातशी आमचे भांडण नाही पण आमचे हक्काचे घास नेतायेत, तिथे आम्ही लढणारच. गुजरातला काय काय पळवले ? वेदांता फॉक्सकॉन, पर्लट्रक पार्क, एअरबस टाटा, सोलर इक्विटी प्लांट, महानंद दिला, टेस्ला पण जाणार. हे चित्र बदलणं गरजेचं आहे, गुजरातशी वादाचे कारण नाही पण हे भांडण भाजप लावतंय, असा आरोप त्यांनी केला आहे.

Maharashtra Politics 2024
Maharashtra Politics 2024 : 'अजित पवारांवरील आरोप सिद्ध झाले नाहीत'; फडणवीसांची अजितदादांना जाहीर क्लीन चिट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com