Sanjay Raut case against Twitter Saam TV
मुंबई/पुणे

Sanjay Raut Latest News: संजय राऊतांना कोर्टाचा दणका; वेळ वाया घालवला म्हणून ताशेरे ओढत खटलाच केला रद्द

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना कोर्टाने मोठा झटका दिला आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> सचिन गाड

Sanjay Raut case against Twitter: ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना कोर्टाने मोठा झटका दिला आहे. राऊत यांनी ट्विटर विरोधात दाखल केलेला खटला कोर्टाने रद्द केला आहे. याप्रकरणी आदेश देताना कोर्टाने राऊतांना खडेबोलही सुनावले आहेत. या प्रकरणाने कोर्टाचा विनाकारण वेळ घेतला, असं मुख्य महानगर दंडाधिकारी, किल्ला कोर्ट संग्राम बाळासाहेब काळे म्हणाले आहेत.

काय आहे प्रकरण?

संजय राऊत यांनी एप्रिल २०२१ मध्ये हा खटला दाखल केला होता. राऊत यांनी त्यांच्या विरोधातील आक्षेपार्ह ट्विट्स, तसेच गुगल, यूट्यूब अपमानकारक मजकूर हटवण्याची मागणी केली होती. मात्र ७ एप्रिल २०२२ पासून संजय राऊत आणि त्यांचे वकील प्रत्येक तारखेस गैरहजर राहिले आहेत. असं निरिनिक्षण कोर्टाने याचिका फेटाळताना नोंदवलं आहे.

कोर्टाने म्हटलं आहे की, खटला प्रलंबित ठेऊन काही साद्य होणार नाही. या प्रकरणाने कोर्टाचा विनाकारण वेळ घेतला. असं म्हणत मुख्य महानगर दंडाधिकारी बाळासाहेब काळे यांनी हा खटला रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.  (Latest Marathi News)

संजीव जयस्वाल यांच्या घरावर ईडीची धाड, संजय राऊत यांनी दिली तिखट प्रतिक्रिया

दरम्यान, मुंबई महापालिकेतील कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी मुंबईत धाडसत्र सुरु आहे. यातच आज बीएमसीचे तत्कालिन अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्या घरावरही छापेमारी सुरु आहे.

याचबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले आहेत की, आमच्यावर बंदुका चालवा किंवा गोळ्या घाला आमची घोडदौड सुरूच राहणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : बड्या आमदाराच्या वाहनावर कारवाई, अकोल्यात खळबळ

भयंकर! रोज दारू का पितेस? भडकलेल्या बायकोने नवऱ्यावर केला चाकू हल्ला

Gold Rate: सोनं झालं स्वस्त, तब्बल १२ हजारांनी भाव कोसळला; चांदीही ३५ हजारांनी घसरली, महिनाभरात नेमकं काय घडलं?

Mumbai : बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी काँग्रेसचा नेता अडचणीत; तब्बल २० वर्षांनी पोलिसांत गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Coconut Milkshake Recipe: उन्हाळ्यात घरीच बनवा थंडगार 'नारळाचा मिल्कशेक', एकदम सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT