Sandeep Deshpande slams BJP Ashish Shelar over MNS Deepotsav 2023 Shivaji park Saam TV
मुंबई/पुणे

MNS vs BJP : हिंमत असेल तर गुजरातीऐवजी मराठी माणसाला पंतप्रधान करा; दीपोत्सवावरुन मनसे-भाजपमध्ये जुंपली

MNS vs BJP Clash: वसुबारसच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शिवाजी पार्कवर दीपोत्सव साजरा करण्यात आला. या दीपोत्सवावरुन मनसे भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे.

Satish Daud

MNS vs BJP Clash

राज्यात एकीकडे दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला आहे. तर दुसरीकडे भाजप आणि मनसेमध्ये वादाचे फटाके फुटत आहेत. वसुबारसच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शिवाजी पार्कवर दीपोत्सव साजरा करण्यात आला. या दीपोत्सवाला हिंदी काही हिंदी कलाकारांना आमंत्रित करण्यात आलं होतं. यावरून भाजप नेते आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शिवाजी पार्कवर (Shivaji Park) सलीम जावेदला घेऊन मनसेने दीपोत्सव साजरा केला, पण आमचे मराठी कलाकारही काही कमी नाहीत, असं आशिष शेलार यांनी म्हटलं. इतकंच नाही, तर आम्हीही एखाद्या कार्यक्रमाला सलीम खान आणि जावेद अख्तर यांना बोलवू. पण, तो कार्यक्रम दीपावलीचा नसेल, असा टोला आशिष शेलारांनी राज ठाकरेंना लगावला.

दरम्यान, आशिष शेलार यांच्या या टीकेचा मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी चांगलाच समाचार घेतला. आमच्या मराठी प्रेमाबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्यांचं मराठी प्रेम हे पुतनामावशीच प्रेम आहे. हिम्मत असेल तर गुजराथी ऐवजी मराठी माणसाला पंतप्रधान करा, असं आव्हान संदीप देशपांडे यांनी भाजपला दिलं आहे.

मराठी कलाकारांवर अन्याय होतो तेंव्हा त्यांच्या पाठीशी कोण उभं राहत आणि कोण पाठीला पाय लावून पळत महाराष्ट्राला माहित आहे. दीपावलीच्या शुभेच्छा, असंही मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत मनसे आणि भाजपमध्ये आणखी वादाचे फटाके फुटण्याची शक्यता आहे.

आशिष शेलार काय म्हणाले होते?

दीपोत्सव करणाऱ्यांनी सलीम खान आणि जावेद अख्तर यांना घेऊन टिमकी वाजवून घेतली. पण, आमचे मराठी कलाकार छोटे नाहीत. मराठी कलाकारांच्या उपस्थितीत दीपोत्सव झाला पाहिजे, ही भाजपाची संकल्पना आहे, असं आशिष शेलार यांनी म्हटलं होतं. आम्हीही एखाद्या कार्यक्रमाला सलीम खान आणि जावेद अख्तर यांना बोलवू. पण, तो कार्यक्रम दीपावलीचा नसेल, असा टोलाही शेलार यांनी मनसेला लगावला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पिंपरीमध्ये धर्मांतराचा प्रयत्न, गलेलठ्ठ पैशांचं आमिष, अमेरिकन नागरिकाला अटक

Kokan Ganeshotsav : गणेशभक्तांचा प्रवास यंदाही खड्ड्यातून, मुंबई-गोवा महामार्गाची चाळण; कोकणवासीयांसमोर विघ्न कायम

IND VS ENG: पाचव्या टेस्ट सामन्यातून ऋषभ पंत बाहेर; 'या' नवख्या खेळाडूला टीम इंडियात संधी, BCCI ने केलं कन्फर्म

शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्तांनी उचललं टोकाचं पाऊल; घरातच गळफास घेत आयुष्य संपवलं

Rave Party : खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट, खडसेंच्या जावायाचा अल्कहोल रिपोर्ट समोर

SCROLL FOR NEXT