Sandeep Deshpande first reaction on MNS Thackeray group alliance talks Maharashtra Politics  Saam TV
मुंबई/पुणे

MNS-Shivsena Alliance: मनसे-ठाकरे गट एकत्र येणार? युतीच्या चर्चांवर संदीप देशपांडेंची पहिली प्रतिक्रिया

MNS-Shivsena Alliance News: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

MNS-Shivsena Alliance News: राज्याच्या राजकारणात पुन्हा एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. कारण, राज ठाकरे यांची मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत युती होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. मनसे नेते अभिजित पानसे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची सामना कार्यालयात भेट घेतली. या भेटीत पानसे यांनी युतीचा प्रस्ताव दिल्याची माहिती आहे.

त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance) एकत्र येणार का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. अभिजित पानसे यांनी काही कारणास्तव संजय राऊत यांची भेट घेतली असेल, मनसेकडून (MNS News) असा कुठलाही प्रस्ताव दिला गेला असेल, तर याबाबत मला काहीच माहित नाही, याची माहिती स्वत: अभिजित पानसे हेच देऊ शकतील, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

राऊतांच्या भेटीनंतर अभिजित पानसे काय म्हणाले?

दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या भेटीनंतर मनसे नेते अभिजित पानसे राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शिवतीर्थावर पोहचले. यावेळी त्यांनी साम टीव्हीला आपली प्रतिक्रिया दिली. मी खासगी कामानिमित्त संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी सामना कार्यालयात गेलो होतो. आमची युतीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असं म्हणत अभिजित पानसे यांनी युतीची चर्चा फेटाळून लावली आहे.

बीडमध्ये राज-उद्धव यांचे झळकले बॅनर्स

बीड शहरात एकाच बॅनरवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो पाहायला मिळत आहेत. ठाकरे कुटुंबातील बंधूंनी एकत्र यावे, अशी भावनिक साद घालण्यात आली आहे.

साहेब... आता तरी एकत्र या, महाराष्ट्राला आता तुमची खूप गरज आहे. आम्हाला तुमच्या विचारांचा महाराष्ट्र हवाय..! या आशाचे हे बॅनर आहेत. विकास खेत्रे नामक तरुणाने हे बॅनर लावले असून यावर कोणत्याही पक्षाचं चिन्ह नाहीये. मुंडेंच्या जिल्ह्यातच हे बॅनर लागल्याने सध्या राजकीय वर्तुळात चर्चा देखील होत आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पेशवे जयंतीनिमित्त रॅली मध्ये सहभाग घेत खासदार मेधा कुलकर्णी यांनी चालवली दुचाकी

Priya Bapat: प्रिया बापटचा स्पेशल बॉसी लूक; लवकरच झळकणार नव्या भूमिका

Asia Cup 2025 : आशिया कपसाठी पाकिस्तानी संघाची घोषणा, PCB चा बाबर आझम-मोहम्मद रिझवानला धक्का

Viral Video: दुकानासमोर उभा असता तो आला अन्...; भारतीय तरुणाला अमेरिकेत मारहाण, VIDEO व्हायरल

Cloudburst: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा ढगफुटी, ७ नागरिकांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT