Sambhaji Raje Chhatrapati's suggestive tweet after rejecting Shivsena's Offer Twitter/@YuvrajSambhaji
मुंबई/पुणे

"मी बांधील असेन तो फक्त जनतेशी"; शिवबंधन नाकारल्यानंतर संभाजीराजेंचं सूचक ट्वीट

Sambhaji Raje Chhatrapati's suggestive tweet after rejecting Shivsena's Offer : काही दिवसांपुर्वीच त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: भाजपचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्या खासदकीचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी भाजपला राम-राम ठोकला. आता पुन्हा राज्यसभेच्या महाराष्ट्रातील (Rajyasabha Election 2022) सहा जागा रिक्त झाल्या आहेत. यासाठी संभाजीराजेही निवडणुक लढवणार आहेत. मात्र यावेळी ते कोणत्याही पक्षाकडून राज्यसभेवर जाऊ इच्छित नाहीत. त्यामुळे त्यांनी भाजपच्या सदस्यात्वाचाही राजीनामा दिला आणि शिवसेनेत प्रवेश करण्याचीही ऑफर नाकारली. यानंतर आता संभाजीराजेंनी सूचक ट्वीट केलं आहे. "मी बांधील असेन तो फक्त जनतेशी" असं संभाजीराजे आपल्या ट्विटमधून म्हणाले आहेत. (SambhajiRaje Chhatrapati Latest News)

हे देखील पाहा -

संभाजीराजे आपल्या ट्विटमधून सूचक इशारा दिला आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतानाचा फोटो शेयर करत लिहिलं की, "महाराज... तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय... मी कटीबद्ध असेन तो तुमच्या विचारांशी... मी बांधील असेन तो फक्त जनतेशी..." असं ट्वीट संभाजीराजेंनी केलं आहे. काही दिवसांपुर्वीच त्यांनी शिवबंधन बांधण्यास म्हणजेच शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिला होता. त्यामुळे आता संभाजीराजे कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचा सूचक इशारा त्यांनी या ट्विटमधून दिला आहे. आज (गुरुवारी) ते राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरणार आहेत.

शिवसेना सहावी जागा लढणार

राज्यसभेसाठी शिवसेनेतर्फे (Shivsena) आज (२६ मे) संजय राऊत (Sanjay Raut) राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दुपारी १ वाजता विधान भवनात ते दाखल होणार असून, यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे देखील यावेळी उपस्थित राहतील, अशी माहिती स्वतः राऊत यांनी दिली. संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्याने त्यांच्या उमेदवारीचा विषय मागे पडला. संजय राऊत यांच्याबरोबर कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नावावर दुसऱ्या जागेसाठी शिक्कामोर्तब करण्यात आले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले होते की, "राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू करण्याची विरोधकांची इर्षा दिसू लागलीय.. भ्रष्टाचारातून पैसा .. त्यातून घोडेबाजार! हे दुष्ट चक्र कधी थांबेल? सहावी जागा शिवसेना लढेल. कोणी कितीही आकडे मोड करावी.. आकडे आणि मोड दोन्ही महाविकास आघाडीकडे आहे. लढेंगे. जितेंगे." असं ट्वीट करत राऊतांनी भाजपला आवाहान दिलंयं.

राज्यसभा नव्हे तर संपूर्ण राज्यच घेणार

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत. मात्र त्यांना भाजप (BJP) आणि महाविकासआघाडी यांच्यापैकी कोणीही पाठिंबा दिला नाही. त्यामुळे छत्रपती संभाजीराजे यांचे समर्थक नाराज झाले आहेत. संभाजीराजेंच्या समर्थकांनी सोशल मीडियावर एक पोस्टर देखील व्हायरल केलं आहे. आता 'राज्यसभा नव्हे तर संपूर्ण राज्यच घेणार' असा मजकूर या पोस्टरमध्ये छापण्यात आला आहे. यामुळे आता संभाजीराजे कोणती भूमिका घेणार? याकडे सर्वांचचं लक्ष लागलंय. संभाजीराजे छत्रपती यांना मराठा संघटनांचा भक्कम पाठिंबा आहे. या संघटनांनी संभाजीराजे यांच्या राज्यसभेतील उमेदवारीसाठी अगोदरच मोर्चेबांधणीला सुरुवात केली होती.

"सर्वच पक्षांनी संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठवण्याचे पुण्य करावे"

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनीही ट्विटरच्या माध्यामातून प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील गडकिल्ले संवर्धन व मराठा आरक्षणाबाबत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या छत्रपतींना पक्षात येण्याची अट कशासाठी? प्रत्येक गोष्टीत राजकारण केलेच पाहिजे का ? सर्वच पक्षांनी संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठवण्याचे पुण्य आपल्या पदरात पाडून घ्यावे, असे आवाहन पाटील यांनी सर्व पक्षांना ट्विटरवरून केलं आहे.

राज्यसभेच्या जागांचं गणित

राज्यसभेच्या एका जागेसाठी ४२ मतांची गरज असते. महाविकास आघाडीकडे १६९ आमदार आणि भाजपकडे ११३ आमदार आहेत. संख्याबळानुसार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. तर भाजपचे दोन उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतात. तिसरी जागा भाजपनं लढवल्यास फोडाफोडी करावी लागू शकते.

सख्याबळ

सध्या महाविकास आघाडीकडे १६९ आमदार आहेत. यात शिवसेनेचे ५५, राष्ट्रवादी ५४, काँग्रेस ४४, इतर पक्ष ८ आणि अपक्ष ८ असं महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. तर भाजपकडे ११३ आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे १०६ आमदार, रासप १, जनसुराज्य १ आणि अपक्ष ५ आमदार अशा एकूण ११३ आमदार भाजपकडे आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येण्यासाठी इच्छुक आहेत - भुजबळ

Raj Thackeray And Uddhav Thackeray: राज आणि उद्धव ठाकरे यांचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो

Maharashtra Marathi Bhasha: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा जल्लोष मुंबई लोकलमध्येही|VIDEO

Raj-Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे याआधी एकाच मंचावर कधी आणि कुठे आले होते?

Sushil Kedia: राज ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT