नगर : राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) पक्षाचा जन्म हा महाविकास आघाडीमध्ये (mva) शिवसेना (shivsena) संपवण्यासाठी झालेला आहे. राजेंच्या (yuvraj sambhajiraje chhatrapati) उमेदवारीवरून राजकीय चर्चा सुरू असताना या विषयाची सुरुवात कोणी केली. याला ठिणगी कोणी लावली आणि आज आगीत कोण जळतय हे सर्व महाविकास आघाडीचे चित्र जनता पाहत असल्याचे भाजप (bjp) नेते खासदार सुजय विखे-पाटील यांनी नमूद केले. (Sujay Vikhe patil latest marathi news)
खासदार सुजय विखे म्हणाले शिवसेना हा पक्ष गेल्या ३ वर्षात फक्त आरोप सहन करण्यातच मग्न आहे. एका राजकीय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीपुर्वीच त्यांना पाठिंब्याची घोषणा केली. त्यापुर्वी हा विषय चर्चेत देखील न्हवता. पाठिंब्याची घोषणा करून हा विषय चर्चेला आणला आणि तो विषय सेनेकडे वळविण्यात आला. आज जिथून या चर्चेला सुरुवात झाली ज्या व्यक्तींनी या चर्चेला वाचा फोडली त्यांच्यावर आज कुठलाच आरोप नाही. सगळा दोष हा शिवसेनेला दिला जात आहे असे विखे यांनी नमूद केले.
सूजय विखे पुढं म्हणाले राज्याच्या निधी पैकी ७६ टक्के बजेट हे राष्ट्रवादी घेत आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असून त्यांना निधी नाही फक्त टीकेचा धनी, त्रासाचा धनी त्यांना केले जात आहे. तरी देखील सेना महाविकास आघाडीतून बाहेर पडत नाही ही खूप मोठी शोकांतिका असल्याचे विखे यांनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.