Maharashtra Swarajya Paksha Saam Tv
मुंबई/पुणे

Sambhajiraje Chhatrapati: संभाजीराजे छत्रपतींच्या संघटनेला पक्ष म्हणून मान्यता, निवडणूक आयोगकडून चिन्हही मिळालं

Maharashtra Swarajya Paksha: संभाजीराजे छत्रपतींच्या संघटनेला निवडणूक आयोगाकडून पक्ष म्हणून मान्यता मिळाली. आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे.

Priya More

सूरज मसूरकर, मुंबई

कोल्हापूरचे छत्रपती संभजीराजेंच्या स्वराज्य संघटनेला निवडणूक आयोगाकडून पक्ष म्हणून मान्यता मिळाली. संभाजीराजे छत्रपतींच्या संघटनेला 'महाराष्ट्र स्वराज्य पक्ष' म्हणून भारत निवडणूक आयोगाने मान्यता दिली. तसेच महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आगामी विधानसभा निवडणुका लढवणार असल्याचे निश्चित झाले आहे. निवडणूक लढवण्यासाठी त्यांना सप्त किरणांसह पेनाची निब हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. स्वत:संभाजीराजे छत्रपतींनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही आनंदवार्ता सर्वांसोबत शेअर केली आहे.

छत्रपती संभजीराजेंनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट करत ही आनंदाची बातमी सर्वांना सांगितली. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले की, 'आनंदवार्ता…! स्वराज्य संघटनेचे सर्व कार्यकर्ते, चाहते व हितचिंतक तसेच तमाम महाराष्ट्रवासियांना कळविणेस अत्यंत आनंद होतो की, ९ ऑगस्ट २०२२ रोजी तुळजाभवानी मातेच्या साक्षीने आणि हजारो शेतकरी, कष्टकऱ्यांच्या साथीने स्थापन झालेली 'स्वराज्य संघटना' आता भारतीय निवडणूक आयोगाकडे 'महाराष्ट्र स्वराज्य पक्ष' या नावाने एक राजकीय पक्ष म्हणून अधिकृतपणे नोंदणीकृत झालेला आहे. अर्थातच, स्वराज्य संघटना आजपासून 'महाराष्ट्र स्वराज्य पक्ष' म्हणून ओळखला जाईल.'

तसंच, 'याचबरोबर, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला 'सप्तकिरणांसह पेनाची निब' हे निवडणूक चिन्ह प्राप्त झालेले आहे. मागील वर्षभरात आपण आपली संघटना एक पक्ष म्हणून घराघरात पोहोचवलीच आहे, आता अधिक जोमाने आपल्याला मिळालेले निवडणूक चिन्ह देखील सर्व मतदारांपर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्रातील जनतेचे आपल्यावर असलेले प्रेम, पक्ष संघटनेचे कार्यकर्ते व हितचिंतकांचे कष्ट, राज्याच्या राजकारणाला असलेली एका नवीन व सुसंस्कृत पर्यायाची आवश्यकता ही आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करत, परिवर्तन महाशक्तीस सत्तास्थानी घेऊन जाईल, हे निश्चित! जय स्वराज्य !', असे देखील त्यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raipur Steel plant : स्टील प्लांटमध्ये मोठी दुर्घटना; ६ कामगारांचा मृत्यू, अनेक जण दबल्याची भीती

Maharashtra Live News Update: पुण्यात रस्त्याच्या मागणीसाठी तीन गावातील गावकऱ्यांचे आमरण उपोषण

Amla For Hair: आवळ्याचा केसांवर कोणता परिणाम होतो?

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

SCROLL FOR NEXT