Shivsena Uddhav Thackeray Groups Mashal Symbol  Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Political Crisis : ठाकरे गटाचं मशाल चिन्हही काढून घ्या; निवडणूक आयोगात कुणी दिलं निवेदन?

ठाकरे गटाच्या अडचणी थांबण्याचं नाव घेत नाही. कारण, मशाल चिन्हाविरोधातही निवडणूक आयोगात एका व्यक्तीने निवेदन दिलं आहे.

Shivaji Kale

Maharashtra Political Crisis : केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी एक मोठा निर्णय दिला. शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव शिंदे गटाला देण्यात आलं. ठाकरे गटाला बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण, त्यांना आता येणाऱ्या निवडणूकीत मशाल या चिन्हाचाच वापर करावा लागणार आहे. मात्र, इथेही ठाकरे गटाच्या अडचणी थांबण्याचं नाव घेत नाही. कारण, मशाल चिन्हाविरोधातही निवडणूक आयोगात एका व्यक्तीने निवेदन दिलं आहे. (Latest Marathi News)

 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला दिलेलं मशाल हे निवडणूक चिन्ह काढून घ्यावं, अशी मागणी समता पक्षाकडून करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन कैलाश कुमार नामक व्यक्तीने निवडणूक आयोगाकडे दिलं आहे. आज दुपारपर्यंत समता पक्षाचे शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयोगात जाणार आहे. समता पक्षाचे अध्यक्ष उदय मण्डल यांच्या नेतृत्वात हे शिष्टमंडळ आयुक्तांची भेट घेणार आहे. (Political News)

मशाल चिन्हावरून का होतोय वाद?

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेतून उठाव केला. त्यामुळे तत्कालिन महाविकास आघाडी सरकारचं बहुमत कमी झालं. परिणामी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शिवसेनेत  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे असे दोन गट पडले. दोन्ही गटाकडून शिवसेना आणि धनुष्यबाण या चिन्हावर दावा करण्यात आला होता.

पुढे हे प्रकरण सुप्रीम कोर्टात (Supreme Court)  गेलं. सुप्रीम कोर्टाने या निर्णयाची जबाबदारी निवडणूक आयोगाकडे सोपावली. दरम्यान, निवडणूक आयोगाने अंतिम निकाल येईलपर्यंत पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आलं होतं. तर शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह मिळालं.

अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरेंच्या हाती मशाल

पुढे ठाकरे गटाचे मशाल याच चिन्हावर अंधेरी येथील पोटनिवडणूक लढवली. मशाल हाती घेऊन ठाकरे गटाने निवडणूकीत आपला उमेदवार निवडून आणला. त्याआधीच समता पक्षाकडून मशाल चिन्ह हे आपलं असल्याचा दावा करण्यात आला. याप्रकरणात त्यांनी निवडणूक आयोगात निवेदनही दिलं. मात्र, निवडणूक आयोगाने त्यांचा हा दावा फेटाळून लावला.

दरम्यान, शुक्रवारी निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नाव शिंदे गटाला दिलं. त्यामुळे आता ठाकरे गटाला मशाल याच चिन्हाचा वापर करावा लागणार आहे. मात्र आता मशाल या चिन्हावर देखील समता पक्षाने दावा केल्यानं ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आज दुपारच्या सुमारास समता पक्षाचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाकडे जाणार आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

Assembly Election: बटेंगे तो कटेंगेला भाजपातूनच विरोध; पंकजा मुंडेंनंतर अशोक चव्हाणांचाही विरोध

IND vs AUS: बुमराह बॅटिंगला आला अन् रिषभ गोलंदाजीला; BCCI ने शेअर केला दोघांच्या जुगलबंदीचा VIDEO

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कराडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध

Assembly Election: बल्लारपूरमध्ये रंगणार तिरंगी लढत; सुधीर मुनगंटीवारांपुढे काँग्रेसच्या संतोष सिंह रावतांचं आव्हान

SCROLL FOR NEXT