Thackeray Vs Shinde : ठाकरे-शिंदे गटात आणखी संघर्ष पेटणार; शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह गेलं, शिवसेना भवनाचं काय?

ठाकरे गटाकडून शिवसेना भवन जाणार का, अशी चर्चा आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
Uddhav Thackeray vs Eknath Shinde
Uddhav Thackeray vs Eknath ShindeSaam TV
Published On

निवृत्ती बाबर

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाने उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना नाव, धनुष्यबाण हातातून निसटलं आहे. त्यामुळे ठाकरे गटासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाकडून शिवसेना भवन जाणार का, अशी चर्चा आहे. यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. (Latest Marathi News)

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. या निर्णयानंतर ठाकरे गटात नाराजी पसरली आहे.

ठाकरे गटाकडून शिवसेना नाव, धनुष्यबाण हातातून निसटल्यानंतर काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddahv Thackeray) यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. ठाकरेंकडून शिवसेना नाव, धनुष्यबाण गेल्यानंतर शिवसेना भवनाचं काय होणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र, मुंबईच्या दादरमधील शिवसेना (Shivsena) भवन ठाकरेंकडे राहणार आहे. पण शिवसेना शाखांवरून दोन्ही गटात संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray vs Eknath Shinde
Uddhav Thackeray on Dhanushyaban | निवडणुक आयोगाच्या निकालानंतर Uddhav Thackeray यांचा घणाघात

शिवसेना भवन हे मात्र ठाकरे गटाकडेच राहणार आहे. शिवसेना भवन ही इमारत अधिकृत शिवसेना पक्षाच्या नावावर नाही. तर शिवसेना भवन हे शिवाई ट्रस्टच्या नावावर आहे. त्यामुळे शिवसेना भवनावर शिंदे गट दावा करण्याची शक्यता कमी आहे.

मात्र, शिवसेना शाखांमुळे संघर्ष वाढला तर ठाकरे गटाला आणखी मोठा फटका बसू शकतो. त्याचबरोबर शिवसेनेचे सामना मुखपत्र आणि मार्मिक प्रबोधन प्रकाशन यांच्याकडून प्रकाशित केले जाते. त्यामुळे सामना कार्यालयावरही शिंदे गट दावा करू शकत नाही. मात्र, मुंबईतील अनेक शाखांवर शिंदे गट दावा सांगण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray vs Eknath Shinde
Shahajibapu Patil : धनुष्यबाण मिळाल्यानंतर आमदार शहाजी बापूंचा जल्लोष; थेट डीजेच्या तालावर धरला ठेका, VIDEO व्हायरल

मुंबईत शिवसेनेच्या २२७ प्रभागांमध्ये एकापेक्षा अधिक शाखा आहेत. या शाखा शिंदे गट मिळविण्याचा प्रयत्न करेल. या शाखांवरून दोन्ही गटात मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याच पद्धतीने मंत्रालयाच्या बाजूला शिवालय कार्यालयावरून देखील वाद होण्याची शक्यता आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com