Salon service now at CSMT railway station सुमित सावंत
मुंबई/पुणे

Mumbai: सीएसएमटी रेल्वे स्थानकावर आता सलून सेवा; वैयक्तिक सौंदर्य प्रसाधन केंद्रांमुळे रेल्वेचा महसूल वाढणार..

Mumbai Local Train News: यात दाढी करणे, केसं कापणे, फेशियल करणे, बॉडी मसाज, फिजिओथेरपी अशा अनेक सुविधा प्रवाशांना मिळणार आहे.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मध्य रेल्वेने प्रवाशांना आणखी एक भन्नाट सुविधा दिली आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी अर्थात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स (CSMT Railway Station) या रेल्वे स्थानकावर आता प्रवाशांना चक्क सलून (salon) सुविधा मिळाणार आहे. यात दाढी करणे, केसं कापणे, फेशियल करणे, बॉडी मसाज, फिजिओथेरपी अशा अनेक सुविधा प्रवाशांना मिळणार आहे. या सुविधेमुळे प्रवास सुरु करण्यापुर्वी किंवा प्रवासानंतर चकाचक दिसण्यासाठी प्रवाशांना आता रेल्वे स्थानकावरच सलून उपलब्ध झाल्याने प्रवाशांना त्याचा मोठा फायदा होणार असून रेल्वेलाही चांगला महसूल मिळणार आहे. (Salon service now at CSMT railway station; Personal cosmetic centers will increase railway revenue)

हे देखील पहा -

भारतीय रेल्वेच्या सर्व झोनमध्ये गैरशुल्क (नॉन-फेअर) महसुलामध्ये पहिल्या क्रमांकावर असण्याचा मान मध्य रेल्वेला आहे. १ एप्रिल २०२१ ते २० मार्च २०२२ या कालावधीत, याअंतर्गत महसूल रु. २८.८८ कोटी प्राप्त झाले जे मागील वर्षी याच कालावधीत मिळवलेल्या महसुलापेक्षा ३८% अधिक आहे. गैरशुल्क (नॉन-फेअर) महसुलाच्या बाबतीत मुंबई विभाग १ एप्रिल २०२१ ते २३ मार्च २०२२ या कालावधीसाठी रु. २१.९६ कोटींसह आघाडीवर आहे. मध्य रेल्वे मुंबई विभागाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे गैरशुल्क महसूल अंतर्गत प्रथमच "वैयक्तिक सौंदर्य प्रसाधन केंद्रे" सुरू केली आहेत. या उपक्रमामुळे ५ वर्षांसाठी ७५ लाख रुपयांचा महसूल मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावरील वैयक्तिक सौंदर्य प्रसाधन केंद्राचे (पर्सनल केअर सेंटर) बांधकाम, संचालन, देखभाल आणि व्यवस्थापन यासाठीचे कंत्राट रु. १४,७७,०००/- प्रतीवर्ष या प्रमाणे पाच वर्षांच्या कालावधीसाठी देण्यात आले आहे.

या संकल्पनेअंतर्गत, परवानाधारकांना आपत्कालीन, जेनेरिक आणि आयुर्वेदिक औषधे, वैयक्तिक सौंदर्य प्रसाधन वस्तू इत्यादींची विक्री करण्याची परवानगी दिली जाईल. बॉडी मसाज चेअरद्वारे मसाजच्या सुविधा, पात्र फिजिओथेरपिस्टद्वारे फिजिओथेरपी, केशभूषा, शेव्हिंग, फेशियल इत्यादी सलून सेवा वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असतील. गैर-शुल्क (नॉन-फेअर) महसूल उपक्रमांतर्गत असे अनेक उपक्रम घेतले जात आहेत ज्यामुळे प्रवाशांना फायदा होईल आणि रेल्वेला मोठा महसूल मिळेल.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mrunal Thakur: मराठमोळी थोडीशी साधीभोळी; धुळ्याची लेक पैठणीत दिसतेय लय भारी

Maharashtra Live News Update: स्वत:च्या फायद्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र, मनसे-शिवसेना युतीवर आशिष शेलारांची टीका

Vrishabh Hororscope 2026: अचानक धनलाभ होणार, पाहा कसं असेल वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी पुढचं वर्ष?

Lagnacha Shot: लग्नाचा शॉटमध्ये प्रियदर्शिनी- अभिजीत घालणार गोंधळ

Kitchen Hacks : मॉड्युलर किचन बनवत आहात, मग या गोष्टी लक्षात घ्या

SCROLL FOR NEXT