धारावीकरांनी करून दाखवलं! कोरोनाचा एकही सक्रिय रुग्ण नाही

धरावी मॉडेलमुळे अनेकदा 0 मृत्यूची नोंद या ठिकाणी झाली आहे, पण आता धारावीत एकही सक्रिय रुग्ण नाही.
Corona
Corona Saam Tv

मुंबई - आशियातल्या सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत (Dharavi) कोरोनाच्या (Corona) सुरुवातीच्या काळात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी धरावी मॉडेलचा पालिकेने अवलंब केला. धरावी मॉडेलमुळे अनेकदा 0 मृत्यूची नोंद या ठिकाणी झाली आहे, पण आता धारावीत एकही सक्रिय रुग्ण नाही. त्यामुळे धारावीकरांनी करून दाखवलं असं म्हटलं जातं आहे.

हे देखील पहा -

धारावीत मार्च २०२० मध्ये आलेल्या पहिल्या लाटेत सर्वाधिक 94. दुसऱ्या लाटेदरम्यान 99 रुग्ण आढळून आले होते. तिसऱ्या लाटेदरम्यान धारावीत ७ जानेवारीला 150 तर ८ जानेवारीला 147 रुग्णांची नोंद झाली होती. धारावीत आतापर्यंत एकूण 8652 रुग्ण आढळून आले आहेत. तब्बल दोन वर्षांनी धारावीत एकही सक्रिय रुग्ण नसल्याची नोंद झाली आहे.

Corona
गरीबाच्या ताटातील तांदूळाचा काळाबाजार; पोलिसांनी केली कारवाई

दरम्यान, राज्यात गेल्या 24 तासात 139 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण 78,72,956 कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत आढळले आहेत. तसेच 255 रुग्ण कोरोनमुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 77,24,214 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. गेल्या 24 तासात 3 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 1,43,772 रुग्णांना आपला जिव गमवावा लागला आहे. सध्या राज्यात 965 रुग्ण अॅक्टीव आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com