Sakalchya Batmya Daily Sakal News Podcast
Sakalchya Batmya Daily Sakal News Podcast SAAM TV
मुंबई/पुणे

‘सकाळ’चं ‘पॉडकास्ट’ देशात पहिल्या ५ मध्ये

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे: रोजच्या हटके बातम्या आणि चालू घडामोडींविषयी असलेल्या ‘सकाळ’च्या ‘पॉडकास्ट’ला देशातील टॉप १० मध्ये येण्याचा मान मिळाला असून, श्रोत्यांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळेच हे साध्य होऊ शकले. यामध्ये ‘सकाळ’च्या पॉडकास्टला पाचवा क्रमांक मिळाला आहे. मराठी माध्यमातील पॉडकास्टचा हा प्रयोग वर्षभरातच श्रोत्यांच्या पसंतीला उतरला आहे. याआधी स्थानिक भाषेतील बातम्यांचे पॉडकास्ट म्हणून लोकप्रिय होण्याचा मानही ‘सकाळ’ने मिळवला आहे. (Sakalchya Batmya Daily Sakal News Podcast Show in top 5 Trending Podcasts in India)

पॉडकास्टमध्ये नेमकं काय?

श्रोत्यांना ‘सकाळ’च्या (Sakal) ‘पॉडकास्ट’मध्ये विश्वसनीय बातम्या ऐकण्याबरोबरच हवामानाचे अपडेट, क्रीडा, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी ते राज्यातील मोठ्या घडामोडी सविस्तर ऐकण्यास मिळतात. याबरोबरच देशातील आणि राज्यातील सर्वांत चर्चेत असलेली बातमीदेखील यामध्ये सांगितली जाते. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने येणारे निर्णय, परीक्षांचं वेळापत्रक, निकालाच्या तारखा ते नोकरीच्या संधी, गृहिणींशी संबंधित किचन ते आरोग्य अशा सर्व विषयांचा समावेश या पॉडकास्टमध्ये केला जातो.

‘अनप्लग सेलिब्रिटी टॉक शो’

‘पॉडकास्ट’मध्ये आठवड्याच्या शेवटी म्हणजेच दर शनिवारी ‘अनप्लग सेलिब्रेटी टॉक शो’मध्ये मराठी आणि हिंदीतील सेलिब्रेटींशी मनमोकळ्या गप्पांचा फड रंगवला जातो. आतापर्यंत या सेलिब्रेटी टॉक शोमध्ये अभिनेत्री उर्फी जावेद, मधुराणी गोखले, ‘शेर शिवराज’मधील अभिनेता चिन्मय मांडलेकर आदींनी सहभाग घेतला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

Esha Gupta च्या बोल्ड फोटोंची एकचं चर्चा, फोटो पाहून चाहते थक्क

Custard Apple Benefits : डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सीताफळ उपयुक्त; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

SCROLL FOR NEXT