पुणे: लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी प्रस्तुत सकाळ महा कॉन्क्लेव्ह नागरी व जिल्हा सहकारी पतसंस्थांची 3 दिवसीय महापरिषदेचा दुसऱ्या दिवसाला आज सुरूवात झाली आहे. पुण्यात दिवसभर चालणाऱ्या या कार्यक्रमात सहकार आणि बँकिंग क्षेत्राशी निगडित अनेक सेशन्स असणार आहेत. आज होणाऱ्या या कार्यक्रमाचा मुख्य केंद्रबिंदू असणार आहेत ते देशाचे माजी कृषिमंत्री आणि राष्टवादीचे सर्वासार्वे शरद पवार. सकाळ समूहाच्या सहकार संबंधित या कार्यक्रमात सहकार आणि बँकिंग क्षेत्रातील निगडित अनेक मुद्द्यांवरती चर्चा होत आहे.
डबघाईला आलेल्या सहकार क्षेत्राला नवी उभारी देण्यासाठी काय करता येईल यावर तज्ञांच मार्गदर्शन लाभणार आहे. आज होणाऱ्या पहिल्या सत्रात ऑनलाईन पेमेंट करताना आणि इतर सायबर क्राईम मधून होणाऱ्या फसवणुकीबद्दल सायबरचे अप्पर पोलीस महासंचालक ब्रिजेश सिंग यांचे सायबर सेक्युरिटी इन बँकिंग या विषयावर मार्गदर्शन झाले. तर या नंतर होणाऱ्या सेशन मध्ये सहकाराबद्दल शरद पवार सहकाराबद्दल आपला अनुभव, सहकार क्षेत्रासाठी नवीन योजना याबद्दल आपले मार्गदर्शन करतील तर त्यांनतर ते उपस्थितांशी संवाद देखील साधणार आहेत.
दरम्यान, काल पासून सुरु झालेल्या या कार्यक्रमात अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. केंद्रीय मंत्री डाॅ. भागवत कराड, नितीन गडकरी यांची उपस्थिती होती. नितीन गडकरी या कार्यक्रमात बोलताना म्हणाले होते, सहकार चळवळ ही महाराष्ट्राचे वैभव आहे ती जपली पाहिजे. डाॅ. भागवत कराड बोलताना म्हणाले होते मोठ्या उद्योजकांबरोबरच लहान घटकांनाही कर्ज मिळावे.
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.