सहकार चळवळ टिकली पाहिजे, ते महाराष्ट्राचं वैभव आहे- नितीन गडकरी

''महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राने कधीच राज्याच्या बाहेर जाण्याचा विचार केला नाही ही शोकांतिका आहे''.
नितीन गडकरी
नितीन गडकरीसाम टीव्ही
Published On

पुणे: 'लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप सोसायटी प्रस्तुत सकाळ महा -कॉन्क्लेव्ह नागरी आणि जिल्हा सहकारी पतसंस्थांच्या 3 दिवसीय महापरिषदेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हजेरी लावली होती. कार्यक्रमात बोलताना त्यांनी महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राबाबत खंत व्यक्त केली आहे. ते म्हणाले ''महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राने कधीच राज्याच्या बाहेर जाण्याचा विचार केला नाही ही शोकांतिका आहे''. खाजगी संस्था एवढीच स्वायत्तता सहकाराला असायला हवी तरच फायदा होईल. सहकार कायद्यात सुधारणा करायला हवी असंही मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. सहकारातून भ्रष्टाचार संपायला हवा, ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित ठेवणाऱ्या संस्था असणे गरजेचे आहे, जेणेकरून संस्था डबघाईला येणार नाहीत असं मत गडकरींनी यावेळी व्यक्त केलं.

नितीन गडकरी
मोठ्या उद्योजकांबरोबरच लहान घटकांनाही कर्ज मिळावे - डाॅ. भागवत कराड

गडकरी पुढे बोलताना म्हणाले ''खाजगीकरण सहकारात देखील असायला हवं, त्याचबरोबर जगामध्ये लोक करोडो रुपये घेवून बसलेत ज्यांना भारतात गुंवणूक करायची आहे. आणि विशेष म्हणजे त्यांना व्याजही नको आहे''. या गोष्टी करत असताना सहकार क्षेत्राच्या संचालकांची विश्वासार्हता महत्वाची असल्याची मत गडकरींनी व्यक्त केलं आहे. सहकार चळवळीत होणाऱ्या बदलाबाबत बोलताना गडकरी म्हणाले ''सहकार क्षेत्रात काळाच्या ओघात बदल होत आहेत, ही चळवळ टिकली पाहिजे, ही चळवळ महाराष्ट्रचे वैशिष्ट्य आहे, ही चळवळ सक्सेस स्टोरी आहे''.

सहकार चळवळ ही महाराष्ट्राचं वैभव असल्याचं मतही गडकरींनी व्यक्त केलं आहे. आपल्याकडे ग्रामीण क्षेत्राला संजीवनी देणारी ही चळवळ भविष्यात आणखी यशस्वी होईल. बँकांनी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे अपेक्षित असल्याचं मत गडकरींनी व्यक्त केलं आहे. निवडणूकांबाबत बोलताना गडकरी म्हणाले कोण निवडून येणार आहे या पात्रतेवर निवडणुकीचे तिकीट दिले जाते, कोणी खून केला असेल,(भूतकाळात काहीही असो) पण तरी तो निवडून येत असेल तरी त्याला तिकीट दिले जाते, हेच सत्य आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com