Kareena on Saif Ali Khan Attack : सैफ अलाी खानवर काल त्यांच्या राहत्या घरी हल्ला झाला. हल्ला करणारी व्यक्ती चोरीच्या हेतूने घरात घुसल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. हल्लेखोराने सैफ अली खानवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला. लीलावती रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या हल्ला प्रकरणानंतर सैफची पत्नी करीना कपूर खानने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
करीनाने सोशल मीडियावर स्टोरी पोस्ट करत हल्लावरची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या स्टोरीमध्ये तिने "आमच्या कुटुंबासाठी हा आव्हानात्मक दिवस होता. घडलेली घटना पचवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आमचे कुटुंब कठीण परिस्थितीचा सामना करत आहे. या काळात मीडिया आणि पापाराझी यांनी तर्कवितर्क लावू नये अशी मी विनंती करते."
"सर्वांना दाखवलेल्या प्रेमाची आणि काळजीची आम्ही प्रशंसा करतो. सतत मिळणाऱ्या अटेन्शनमुळे आम्ही भारावून गेलो आहोत. पण त्यामुळे आमच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत आहे. माझी विनंती आहे की तुम्ही आमच्या स्वातंत्र्याचा आदर करावा आणि एक कुटुंब म्हणून या परिस्थितीचा सामना करण्यासाठी वेळ द्यावा. अशा संवेदनशील काळात तुम्ही आम्हाला समजून घेतल्याबद्दल आणि सहकार्य केल्याबद्दल मी आभार मानू इच्छिते", असे करीना कपूर-खानने म्हटले आहे.
सैफ अली खानवर चाकूने हल्ला केलेल्या हल्लेखोराचा चेहरा इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. पोलिसांना त्याची ओळख पटली आहे. पोलिसांच्या १० टीम हल्लेखोराचा शोध घेत आहेत. दरम्यान सैफ अली खानवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे बॉलिवूड हादरले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.