Saif Ali Khan Attack  Saam Tv
मुंबई/पुणे

Saif Ali Khan Attack: ५ महिन्यापूर्वी मुंबईत आला, नावात बदल केला; सैफ हल्ला प्रकरणी बांगलादेश कनेक्शन, मुंबई पोलिसांची मोठी माहिती

Mumbai Police On Saif Ali Khan Attack Case: सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आरोपीला ठाण्यातून अटक करण्यात आली असून सध्या त्याची चौकशी सुरू आहे.

Priya More

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकूहल्ला करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकण्यात मुंबई पोलिसांना अखेर यश आले. तिसऱ्या दिवशी आरोपीला पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी शनिवारी मुंबई पोलिसांनी एका आरोपीला मध्यप्रदेशमधून अटक केली. तर दुसऱ्या आरोपीला ठाण्याच्या हिरानंदानी इस्टेट परिसरातून अटक केली. हा आरोपी बांगलादेशी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. आरोपीच्या अटकेनंतर आज सकाळी मुंबईचे पोलिस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.

दीक्षित गेडाम यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सैफवर हल्ला प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव मोहम्‍मद शरीफुल इस्‍लाम शहजाद असे आहे. १६ जानेवारी रात्री २ वाजता त्याने सैफ आली खानच्या घरी चोरी करण्याच्या उद्देशाने प्रवेश केला होता. तेव्हा सैफवर हल्ल्याची घटना घडली. आरोपीचे वय ३३ वर्षे आहे. आरोपीला आज कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे. आरोपीला पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी आम्ही करणार आहोत. त्यानंतर पुढील तपास केला जाईल.'

पोलिस उपायुक्तांनी पुढे सांगितले की, 'आरोपी मोहम्‍मद शरीफुल इस्‍लाम शहजाद हा बांगलादेशी असल्याची आम्हाला शंका आहे. म्हणून यात काही सेक्शन वाढवण्यात आली आहेत. आतापर्यंत त्याने इथे प्रवेश केला की नाही याबाबत पुढील चौकशीत उघड होईल. तो भारतीय असल्याचे त्याच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. भारतामध्ये बेकायदेशीर प्रवेश केल्यानंतर आरोपीने आपले नाव बदलले असल्याचा आम्हाला संशय आहे. त्याने विजय दास असे नाव ठेवले आहे. '

तसंच, 'आरोपी ५ ते ६ महिन्यापूर्वी मुंबईत आला. काही दिवसांपूर्वी तो मुंबईच्या काही भागांमध्ये काम करत होता. त्यानंतर तो परत गेला होता. १५ दिवसांपूर्वी तो मुंबईत परत आला. हाऊसकिपिंग एजन्सीमध्ये तो काम करत होता. त्याच्या पासपोर्टसंदर्भातील माहिती मागवली आहे. आरोपीला अटक केल्यानंतर आम्हाला खूप कमी वेळ मिळाला आहे. पुढचा तपास आम्ही करत आहोत. या आरोपीला आम्ही अटक केल्यानंतर त्याची चौकशी केली तेव्हा त्याची उत्तर आणि त्याच्याकडे मिळाल्या साहित्यावर तो बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झालं. त्या अनुषंघाने आम्ही तपास करत आहे. त्याने सैफ अली खानला टार्गेट का केले? याबाबत प्राथमिक चौकशी सुरू आहे.', असे पोलिस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

Maharashtra Live News Update: यवतमाळच्या स्वस्तिक प्लाझामध्ये आग

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT