sai baba devotee donated dialysis machine to sai sansthan hospital shirdi news sml80 Saam Digital
मुंबई/पुणे

शिर्डीतील साईनाथ रुग्णालयात डायलिसिस सुविधा मिळणार मोफत, साई भक्ताकडून 24 लाखाच्या मशीनची देणगी

Siddharth Latkar

- सचिन बनसाेडे

Shirdi Sai Baba News :

शिर्डी येथील साईबाबांच्या दरबारात देशासह परदेशी भाविक साईंच्या चरणी साेने, नाणेसह काेट्यावधी रुपयांचे दान अर्पण करीत असते. आज एका भाविकाने साई संस्थानच्या (sai sansthan) रुग्णालयास डायलिसिस मशीन भेट देत रुग्णसेवेची अधिक संधी दिली आहे. (Maharashtra News)

गरीब आणि गरजू रुग्णांसाठी साईबाबा संस्थानचे रूग्णालय वरदान ठरलय. निशुल्क सेवा देणा-या साईनाथ रुग्णालयास साईभक्त अशोक गुप्ता यांनी तब्बल 24 लाखाचं डायलिसिस युनिट साईंच्या चरणी देणगी स्वरूपात दिलय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

साईनाथ रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना डायलिसिस सुविधा आता मोफत मिळणार आहे. साईनाथ रुग्णालयात डायलिसिस मशीनची विधिवत पूजा करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी साई संस्थानचे मुख्य अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुळवळे, देणगीदार साईभक्त अशोक गुप्ता तसेच संस्थांनच्या विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, भाविक उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope: रविवारी या 3 राशींचे भाग्य सूर्या सारखे चमकणार, गणरायाची होईल कृपा

Best Selling Cars: या ५ कार्सची बाजारात वाढली मागणी, खरेदीसाठी होतेय गर्दी; पाहा लिस्ट

Maharashtra Politics : राऊतांचे वार, मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार; नेमकं राज्यात काय राजकारण शिजतंय? VIDEO

Rashi Bhavishya Today : अचानक धनलाभ होण्याची शक्यता, आरोग्याची काळजी घ्या; वाचा रविवारचे राशीभविष्य

Weight Loss: जीममध्ये न जाता वजन कसे कमी कराल?

SCROLL FOR NEXT