मुंबई-गोवा महामार्गाबद्दल सुनील तटकरेंनी व्यक्त केलं दुःख!
मुंबई-गोवा महामार्गाबद्दल सुनील तटकरेंनी व्यक्त केलं दुःख! SaamTV
मुंबई/पुणे

मुंबई-गोवा महामार्गाबद्दल सुनील तटकरेंनी व्यक्त केलं दुःख!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड : मुंबई-गोवा महामार्ग (Mumbai-Goa Highway) राखडल्याचे दुःख कोकणच्याच वाटेला का? देशात रखडलेला एवढा महामार्ग कुठेच नाही खासदार सुनील तटकरे (MP Sunil Tatkare) यांनी केले मुंबई गोवा महामार्गाबाबत दुःख व्यक्त केेले आहे. या महामार्गाचे काम हे 2011 सालापासून सुरू झाले आहे. पळस्पे ते इंदापूर हा पहिलाच टप्पा दहा वर्ष झाले तरी अपूर्णच आहे. भारतात एवढा रखडलेला महामार्ग कुठेच नाही. कोकणच्या वाट्यालाच हे दुःख का याचे उत्तर माझ्याकडे नाही आहे अशी क्लेशदायक प्रतिक्रिया रायगडचे (Raigad) खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केली आहे. पुढच्या काळात मुंबई गोवा महामार्गाचे काम चांगल्या दर्जाचे होईल याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी म्हटले आहे.(Sadness of Mumbai-Goa highway being blocked)

हे देखील पहा-

रायगडचे खासदार सुनील तटकरे यानी आज अलिबाग राष्ट्रवादी काँग्रेस भवनात रायगडच्या विकासकामांच्या अनुषंगाने पत्रकार परिषद घेतली. रायगडमधून जाणारा सागरी महामार्ग, नव्याने होणारा ग्रीनफिल्ड कोकण महामार्ग याबाबत माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली. हे दोन नवे महामार्ग जात असताना सुरू असलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणं काम मात्र अपूर्ण असल्याबाबत खासदार सुनील तटकरे याना प्रश्न विचारला. यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी मुंबई गोवा महामार्गाबाबत दुःख व्यक्त केले.

मुंबई-गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या मार्गाचे काम 2011 पासून सुरू झाले. सुप्रीम आणि महावीर या कंपन्यांना हे या टप्याच्या डांबरीकरण चौपदरी करणाचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांना न जमल्याने जे.एम म्हात्रे कंपनीला काम देण्यात आले होते. त्यामुळे काही प्रमाणात कामाला गती मिळाली. मात्र अद्यापही हे काम रडतखडत सुरू आहे. गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमानी गणेशभक्तांना या महामार्गाच्या अपुऱ्या कामाचा आणि खड्डेमय रस्त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. यावर्षीही गणेशभक्तांना या त्रासातून मुक्ती मिळालेली नाही.

मुंबई गोवा महामार्ग हा देशात रखडलेला एकमेव महामार्ग आहे. कोकणच्याच वाट्याला हे दुःख का यावे याचे उत्तर माझ्याकडे नाही आहे. भविष्यात हा महामार्ग जागतिक दर्जाचा करण्यासाठी सर्वपतोरी प्रयत्न खासदार म्हणून करणार असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: दाभोसा धबधब्यात पोहण्यासाठी गेला, १२० फुटावरून उडी मारली अन् डोहात बुडाला; तरुणाचा भयानक मृत्यू

Shahaji Patil: काय झाडी काय डोंगर.. डायलॉग फेम आमदार शिवसेनेत कसे आले? शहाजी पाटलांनीच केला खुलासा

Weather Forecast: उन्हाच्या झळांपासून मिळणार दिलासा; विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाची शक्यता

Rashi Surya Gochar: ९ दिवसांनंतर सूर्यासारखे चमकेल 'या' ६ राशींच्या लोकांचे भाग्य

Horoscope Today : मेषसह ५ राशीच्या लोकांनी आज 'या' गोष्टी करणं टाळा; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT