SaamTv Sada Sarvankar News
मुंबई/पुणे

Sada Sarvankar : 'मी पक्षासाठी उमेदवारी मागे घेण्यास तयार, पण...'; सदा सरवणकर यांनी मनसेपुढे ठेवली एक अट

Sada Sarvankar on MNS : सदा सरवणकर यांनी माहीम विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत महत्वाचं भाष्य केलं आहे. मी पक्षासाठी उमेदवारी मागे घेण्यास तयार असल्याचे सरवणकर यांनी म्हटलं आहे.

Vishal Gangurde

सचिन गाड, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. माहीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. माहीम विधानसभा मतदारसंघात मनसेकडून महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर यांना उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली जात आहे. यासाठी मनसे नेते आणि शिंदे गटाच्या नेत्यांच्या भेटीगाठी झाल्याचं सांगितलं जात आहे. यानंतर मी उमेदवारी मागे घेण्यास तयार आहे. पण मनसेने महायुतीविरोधातील उमेदवार मागे घ्यावे, अशी अट सदा सरवणकर यांनी ठेवली आहे.

माहीम विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर यांनी मनसेवर भाष्य केलं आहे. सदा सरवणकर म्हणाले, 'मी त्याग करायला तयार आहे. एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवणे महत्वाचे आहे. मनसेने सगळ्याच ठिकाणी महायुती विरोधातील उमेदवार उभे केले आहे. ते त्यांनी मागे घ्यावे. त्यांनी उमेदवारी मागे घेतल्यास मी पक्षासाठी उमेदवारी मागे घेण्यास तयार आहे. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, त्यासाठी महायुतीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आले पाहिजेत'.

'मनसे आमच्या विरोधात उमेदवार देत असतील तर त्यांनी सहकार्याची अपेक्षा करू नये. आम्हाला ठाकरे कुटुंबाचा आदर आहे. सगळीकडे आमच्या विरोधात उमेदवार उभे करायचे. त्यानंतर इकडे सहकार्य मागायचं ही भूमिका योग्य नाही. आमचा एक आमदार वाढणं महत्वाचं आहे. भाजप देखील आमच्यासोबत येतील. युतीचा धर्म पाळावा लागेल असं उपमुख्यमंत्री म्हणाले आहेत, असे सदा सरवणकर पुढे म्हणाले.

महेश सावंत यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन

माहीमचे ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांच्या मुख्य निवडणूक कार्यालय विभागातील शितलादेवी मंदिराजवळ कार्यालय थाटण्यात आलं आहे. खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला खासदार वर्षा गायकवाड देखील उपस्थित झाल्या आहेत. माहीमच्या शितलादेवी मंदिराजवळ महेश सावंत यांचं मुख्य निवडणूक कार्यालय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नवापूर उड्डाणपुलावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू

jalna Crime : लाडक्या बहिणीची बदनामी केली, भावाला राग अनावर, १९ वर्षाच्या तरूणाची केली हत्या

HSRP Update : महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; नियम मोडल्यास दंड

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

SCROLL FOR NEXT