#SaamSurvey किती दिवस बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना असं कॉंग्रेस मिरवणार आहे? Saam Tv
मुंबई/पुणे

#SaamSurvey किती दिवस बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना असं कॉंग्रेस मिरवणार आहे?

कॉंग्रेस पक्ष तीळ-तीळ झिजतोय, कमी होतोय त्या पक्षाची अवस्था खूप वाईट होतेयं त्यावर जास्त लक्ष देणं राजू वाघमारेंना गरजेचं आहे असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला (Mahaviaks Aghadi Government) २८ नोव्हेंबरला दोन वर्षे पुर्ण (2 Years of Maha Vikas Aghadi) होत आहेत. हे सरकार पडणार असं वारंवार विरोधीपक्ष भाजप (BJP) सांगत असला तरी हे सरकार आपला कार्यकाळ पुर्ण करेल असं महाविकास आघाडी सरकारमधील नेते सांगतात. शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी (NCP) आणि कॉंग्रेस (Congress) या तीन पक्षांच्या आजवरच्या कामगिरीवर जनतेच्या मनातली गोष्ट आणि २०२४ चा संभाव्य कौल जाणून घेण्यासाठी सकाळ माध्यम समुह (Sakal Media Group) आणि साम टिव्हीच्या (Saam Tv) माध्यमातून सर्वेक्षण (Saam TV Survey) करण्यात आले होते. यात अनेक तिन्ही पक्षांच्या प्रवक्त्यांसह राजकीय अभ्यासक, पत्रकारही सामील झाले होते. यावेळी पत्रकार तथा राजकीय विश्लेषक सुशील कुलकर्णी (Sushil Kulkarni) यांनी "किती दिवस बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना म्हणून कॉंग्रेस मिरवणार आहे?" असा सवाल उपस्थित करत कॉंग्रेसला आरसा दाखला आहे. (#SaamSurvey How many days is Congress going to have Abdullah Deewana in Begani Shaadi?)

हे देखील पहा -

पत्रकार सुशील कुलकर्णी हे कॉंग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे (Raju Waghmare) यांना उत्तर देताना म्हणाले की, राजू वाघमारेंनी सांगितलं की, आम्हाला आनंद आहे की भाजप पराभूत होतोय, किती दिवस बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना म्हणून कॉंग्रेस मिरवणार आहे? असा खोचक सवाल त्यांनी कॉंग्रेसला केला. पुढे ते म्हणाले की, तिकडे ममता बॅनर्जींनी (Mamata Banerjee) राजू वाघमारे आणि त्यांच्या नेत्यांना सांगितलं की, भेटणं माझ्यासाठी घटनात्मक तरदूद नाहीय, इतक्या वाईट पद्धतीने ममता बॅनर्जी झुगारुन निघून गेलेल्या आहेत. भाजप पराभूत होतंय याचा आनंद व्यक्त करणारी कॉंग्रेस स्वतः किती खाली आहे हे दिसतंय का? सर्वेमध्ये कॉंग्रेसच्या ४० च्या आसपास जागा दिसतायत, यापेक्षा कॉंग्रेसची दुसरी दुरावस्था कुठलीही असणार नाहीय.

सर्वेत भाजपला आलेला फुगवटा कमी केल्यास आणखी कमी केला तरी मागच्या निवडणुकीत भाजपने २५ जागा नविन जिंकल्या होत्या, त्यापैकी काही जागा या भाजपमध्ये नव्याने गेलेल्या नेत्यांनी जिंकल्या. या सगळ्या जागा जरी आपण वजा केल्या तरीही भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरतोय त्यामुळे आम्ही खूप ग्रेट होतो, त्या गेलेल्या जागा आमच्या होत्या असं पाटलांनी सांगू नये आणि राजू वाघमारेंनाही सांगणं आहे की, दुसऱ्याच्या वेदनेत आपला आनंद व्यक्त करु नका. आपला पक्ष (कॉंग्रेस) तीळ-तीळ झिजतोय, कमी होतोय त्या पक्षाची अवस्था खूप वाईट होतेयं त्या पक्षावर जास्त लक्ष देणं राजू वाघमारेंना गरजेचं आहे असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Voter ID: दोन मतदार ओळखपत्र आहेत? होऊ शकते जेल; कारण काय? जाणून घ्या

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, पाहा सोन्याचा आजचा भाव

School Holiday: मतदान केंद्र असलेल्या पालिकेच्या शाळांना उद्या सुट्टी, तर शिक्षण आयुक्त म्हणतात उद्या शाळा सुरु राहणार

SCROLL FOR NEXT