Maratha Reservation News: Saam tv
मुंबई/पुणे

Saamana Editorial : 'मराठा आरक्षणाचा पेच महाराष्ट्राच्या गळ्याला लागलेला फास', 'सामना'तून विचारलेल्या १० प्रश्नांची सरकार उत्तरे देणार का?

Saamana Editorial on Maratha Andolan : एरवी महाराष्ट्राच्या राजकारणात हस्तक्षेप करणारे भाजपचे दिल्लीश्वर आता पळ काढीत आहेत.

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

मराठा आरक्षणासाठी ९ दिवसांपासून सुरु असलेलं आंदोलक  मनोज जरांगे-पाटील यांनी काल २ नोव्हेंबर रोजी मागे घेतलं. सरकारला २ जानेवारीपर्यंतचा वेळ द्यावा, अशी विनंती सरकारने केली होती. सरकारची ही विनंती जरांगे-पाटील यांनी मान्य केली. मात्र उपोषण सुटलं तरी पेच कायम अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचं मुखपत्र सामनातून करण्यात आली आहे. अग्रलेखातून मराठा आंदोलनाबाबत सरकारला १० विचारण्यात आली आहेत.

मराठा आरक्षणाचा पेच हा महाराष्ट्राच्या गळ्याला लागलेला फास आहे. एरवी महाराष्ट्राच्या राजकारणात हस्तक्षेप करणारे भाजपचे दिल्लीश्वर आता पळ काढीत आहेत. 2 जानेवारीनंतर मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे ही जरांगे-पाटलांची मागणी आता मान्य झाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मनोज जरांगे यांनी सर्वपक्षीय विनंतीनंतर उपोषण मागे घेतलं, हे चांगलंचं केलं. मात्र एकीकडे मराठा आरक्षणावरुन राज्य पेटलं असताना राज्य वाऱ्यावर टाकून गृहमंत्री असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीसाठी दिल्लीत गेले. राज्यातील अराजकापेक्षा फडणवीस यांना निवडणूक समितीची बैठक महत्त्वाची वाटते, हे दुःखद आहे, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

सरकारने शब्द पाळला नाही तर मुंबईचे नाक बंद करू, असा इशारा जरांगेंनी दिला. मुंबईचे नाक बंद करणे हे ठीक आहे. पण मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी आता दिल्लीला धडक दिली पाहिजे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नाची चावी पंतप्रधान मोदींच्या खिशात आहे व मोदी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहायला तयार नाहीत, असंही सामनातून म्हटलं आहे. (Latest News)

सामना अग्रलेखातून उपस्थित करण्यात आलेले प्रश्न

1) शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मिंधे सरकार नेहमीच म्हणत आले की, आमच्या मागे महाशक्ती आहे. ही महाशक्ती महाराष्ट्र पेटला असताना झोपली होती काय?

2) देवेंद्र फडणवीस निवडणूक समितीच्या बैठकीसाठी दिल्लीस गेले. तेथे नरेंद्र मोदी व अमित शहा होते. फडणवीस यांनी जरांगे-पाटलांचे उपोषण व महाराष्ट्राच्या स्थितीवर पंतप्रधानांशी चर्चा केली काय?

3) भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राच्या सामाजिक समरसतेला चूड लावायची आहे काय? मराठा समाज विरुद्ध 'ओबीसी' असा झगडा त्यांना पेटवायचा आहे काय?

4) सर्वपक्षीय बैठकीनंतर फडणवीस म्हणाले, ''मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवा. सगळे ठीक होईल.'' याचा अर्थ काय? मराठा आरक्षणापासून फडणवीस स्वतःला लांब का ठेवत आहेत?

5) मनोज जरांगे-पाटील हा फाटका फकीर माणूस असून त्याच्या रक्तात स्वार्थ नाही. त्यामुळे दबाव व खोक्यांनी तो विकत घेता येणार नाही. हीच सरकारची समस्या आहे काय?

6) मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ांवर लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलावून घटनादुरुस्ती करणे गरजेचे आहे. विशेष अधिवेशन बोलवा, अशी मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अद्यापि का केली नाही? व आता तरी ते विशेष अधिवेशन घेतील काय?

7) मनोज जरांगे-पाटील यांना दिल्लीत नेऊन पंतप्रधानांशी चर्चा का घडवली गेली नाही?

8) गुजरातमधील 'पटेल' आंदोलनाप्रमाणे महाराष्ट्रातील 'मराठा' आंदोलन चिरडून टाकायची योजना आहे काय?

9) शेतकऱयांचे आंदोलन दिल्लीच्या सीमेवर वर्षभर लांबवले, तसे मराठय़ांचे आंदोलन सरकारला लांबवत ठेवायचे राजकारण आहे काय?

10) सरकारला जरांगे-पाटलांचे नेतृत्त्व संपवून त्यांचा अण्णा हजारे करायचा आहे काय?

या प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्राला हवी आहेत. थातूरमातूर बैठका व चर्चा यातून मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागणार नाही, असं 'सामना'त म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: टोमॅटो अन् बटाटापेक्षा स्वस्त काजू! जाणून घ्या भारतातील 'हे' अनोखे ठिकाण

Pimpri Chinchwad : हिंजवडीच्या पुरस्थितीनंतर पीएमआरडीएचे कठोर पाऊल; चार जणांवर केला गुन्हा दाखल

Thane : ५६९ जणांचा व्हॉट्सअॅप ग्रुप, मनसैनिकाची शिंदेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, ठाण्याचा शिवसैनिक खवळला

Shweta Tiwari Life : श्वेता तिवारीने १२ व्या वर्षी केली कामाला सुरूवात, मिळायचे 'इतके' पैसे

Loyal boyfriend zodiac signs: कोणत्या राशींचे पुरुष असतात लॉयल बॉयफ्रेंड?

SCROLL FOR NEXT