India Alliance News Saam Tv
मुंबई/पुणे

Saamana Editorial on Congress : 'काँग्रेसने युतीचे महत्त्व शिकायला हवे', ठाकरे गटाने 'सामना'तून कान टोचले

Saamana Editorial on Congress : काँग्रेसने 2024 साठी किमान 150 लोकसभा खासदार निवडून आणण्याचा संकल्प या मंडळींनी सोडला पाहिजे. 'इंडिया' आघाडी मजबूत व मोकळी राहिली तरच ते शक्य आहे.

प्रविण वाकचौरे

Saamana Editorial News :

मोदी सरकारच्या विरोधात एकवटलेल्या 'इंडिया'आघाडीची महत्त्वाची बैठक आज दिल्लात पार पडत आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर इंडिया आघाडीमध्ये फूट पडल्याची चर्चा होती. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आज ही बैठक पार पडत आहे. त्यामुळे अवघ्या देशाचं लक्ष या बैठकीकडे लागलं आहे. शिवसेनेचं (ठाकरे गट) मुखपत्र 'सामना'तून काँग्रेसच्या भूमिकेवर बोट ठेवण्यात आलं आहे.

काँग्रेस जेथे स्वबळावर येण्याची शक्यता निर्माण होते तेथे ते कोणालाच सोबत घ्यायला तयार नाहीत व त्या अहंकारात स्वतःबरोबर 'इंडिया'चे नुकसान करतात असा बोल लावला जातो. ही प्रतिमा काँग्रेसला पुसावी लागेल. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये'इंडिया' आघाडीचा नाहीतर काँग्रेसचा पराभव झाला आहे, अशा शब्दात सामनातून कान टोचले आहेत. (Latest Marathi News)

काँग्रेसने 2024 साठी किमान 150 लोकसभा खासदार निवडून आणण्याचा संकल्प या मंडळींनी सोडला पाहिजे. 'इंडिया' आघाडी मजबूत व मोकळी राहिली तरच ते शक्य आहे. हुकूमशाहीचा पराभव हा एकजुटीतूनच होतो. काँग्रेसला त्या दृष्टीने पुढाकार घ्यावाच लागेल. बैठका होतील. प्रश्न कृतीचा आणि ऐक्याच्या वज्रमुठीचा आहे. हिटलरचा पराभव करूच हे ध्येय हवेच हवे! इंडिया जिंकेल. तीन राज्यांतील निकाल म्हणजे भाजपचा अमरपट्टा नाही. मोदी-शहा अजिंक्य नाहीत. फक्त 'इंडिया' आघाडी अभेद्य हवी इतकेच, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

काँग्रेसला विजयाचा 'केक' एकट्याला खायचा होता

पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला विजयाचा 'केक' एकट्याला खायचा होता. त्यामुळे राज्यातील लहान पक्ष, आघाड्या वगैरेंना दूर ठेवले. मध्य प्रदेशात अखिलेश यादव यांना ठरवून दूर ठेवले. जेथे काँग्रेस स्वबळावर येण्याची शक्यता निर्माण होते तेथे ते कोणालाच सोबत घ्यायला तयार नाहीत व त्या अहंकारात स्वतःबरोबर 'इंडिया'चे नुकसान करतात असा बोल लावला जातो. ही प्रतिमा काँग्रेसला पुसावी लागेल, असा सल्ला सामनातून देण्यात आला आहे.

रथाला 27 घोडे, पण सारथी नाही

'इंडिया' आघाडी म्हणून काँग्रेसने युतीचे महत्त्व शिकायला हवे. 'इंडिया' आघाडीचे महत्त्व वाढवायला हवे. रथाला आज 27 घोडे आहेत, पण रथाला सारथी नाही. त्यामुळे रथ अडकून पडला आहे. 'इंडिया' आघाडीला संयोजक, समन्वयक, निमंत्रक जो काही असेल तो हवा आहे. अशा समन्वयकाची गरज नाही व आहे त्या परिस्थितीत 'चालवू' असे कुणाचे म्हणणे असेल तर ते 'इंडिया'चे नुकसान करीत आहेत. रथाचा सारथी आता नेमावा लागेल. 19 तारखेच्या बैठकीत त्याबाबत निर्णय घेऊनच पुढचे पाऊल टाकावे लागेल.

हजार आचारी व रस्सा भिकारी

2024 साठी 'इंडिया' आघाडीचा 'चेहरा' कोण? याचा फैसलाही करावा लागेल. मोदींसमोर कोण? हा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल. ''आमच्याकडे पंतप्रधान पदासाठी भरपूर चेहरे आहेत. चॉइसच चॉइस आहे,'' असे सांगणे म्हणजे ''दिल बहलाने के लिए खयाल अच्छा है'' त्यातलाच हा प्रकार. इंडिया आघाडीस समन्वयक हवा, तसा एक चेहरा हवा. 'हजार आचारी व रस्सा भिकारी' या भूमिकेतून बाहेर पडावे लागेल, अशी सूचना देखील सामनातून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shengdana Chutney Recipe: भाजलेल्या शेंगदाण्याची तिखट चटणी कशी बनवायची? अत्यंत सोपी आहे रेसिपी

Cyber Crime : चांगला नफा मिळविण्यासाठी गुंतवणूक करणे पडले महागात; कोट्यवधी रुपयांचा गंडा

Sonam Kapoor: अभिनेत्री सोनम कपूर ४०व्या वर्षी पुन्हा होणार आई; लवकरच देणार चाहत्यांना खूशखबर...!

Post Office Scheme: फक्त व्याजावर 12 लाख कमाई! पोस्ट ऑफिसची ही जबरदस्त योजना तुम्ही पाहिली का?

Maharashtra Crop Inspection : शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा निर्णय, प्रत्येक गावात होणार पीक पाहणी, चंद्रशेखर बावनकुळेंचा आदेश

SCROLL FOR NEXT