Saamana Editorial  Saam TV
मुंबई/पुणे

Saamana Editorial : राज्याची आरोग्य यंत्रणा म्हणजे यमाचा दरबार, मुख्यमंत्री आणि २ उपमुख्यमंत्री रेड्यावर स्वार; सामनातून जहरी टीका

Political News : नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नागपुरातील यमाचा दरबार महाराष्ट्राच्या इभ्रतीस काळिमा फासणारा आहे.

प्रविण वाकचौरे

Saamana Editorial News :

नांदेड, छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयांतील मृत्यू तांडवावर सामनातून महायुती सरकारवर सडकून टीका करण्यात आली आहे. एकीकडे राज्यातील शासकीय रुग्णालयांत मृत्यूचे थैमान सुरू आहे. तर दुसरीकडे सरकार निर्दयपणे राजकारणात दंग झाले आहे. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा, अशी मागणी देखील शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून करण्यात आली आहे.

राज्याची आरोग्य यंत्रणा म्हणजे यमाचा दरबार बनला आहे. यमाच्या रेड्यावर एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री बसून मौजा मारीत आहेत. लोकांनी जगावे किंवा मरावे, यापेक्षा आमचेच राजकारण चालावे असे त्या रेड्यावरील स्वारांना वाटते, अशी जहरी टीका सामनातून करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

नांदेड, छत्रपती संभाजीनगर, नागपुरातील यमाचा दरबार महाराष्ट्राच्या इभ्रतीस काळिमा फासणारा आहे. आमदार-खासदारांना विकत घेण्यासाठी पैसा आहेत, मात्र शासकीय रुग्णालयांमध्ये औषध खरेदीसाठी सरकारकडे पैसे नाहीत. यमाचा रेडाही हे चित्र पाहून रडत असेल, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे. (Political News)

सामनातून सरकारला प्रश्न

औषध खरेदीच्या ठेकेदारीने तीन जिल्ह्यांत 100 बळी घेतले. याची चौकशी 'ईडी-बिडी' करणार आहे काय? आरोग्य खात्याचा निधी गेला कोठे? रुग्णालयात डॉक्टर-नर्सेस का नाहीत? आरोग्य मंत्री कोठे झोकांड्या देत फिरत आहेत याचे उत्तर कोण देणार? असे प्रश्न सामनातून सरकारला विचारण्यात आले आहेत.

राज्यात मृत्यूचे तांडव सुरु होते आहे, नातेवाईकांचा आक्रोश सुरू आहे. दुसरीकडे सरकारच्या डोळ्यांत अश्रूचे एक टिपूस नव्हते. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस हे दिल्लीत पालकमंत्रीपदाचा तिढा सोडवत बसले. दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्रीपद मिळत नाही म्हणून रुसून बसले, असा टोलाही सामनातून लगावण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Big Action: मुख्यमंत्र्यांकडून मोठी कारवाई! कारागृह उपअधीक्षक सेवेतून बडतर्फ, १७ पोलिसांचे तडकाफडकी निलंबन

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये कमी मतदार नोंदणीसाठी पक्षातील काही नेते जबाबदार, भाजप नेत्याचा गंभीर आरोप

Ratnagiri Water Stock : रत्नागिरीकरांनो, पाण्याची चिंता मिटली! पुढील ५ महिने टेन्शन नाही, धरणांमध्ये किती साठा?

ICICI बँकेची दिवाळीपूर्वी मोठी घोषणा! FD च्या व्याजदरात वाढ, कोणत्या मुदत ठेवीवर किती व्याज मिळणार? वाचा

Real vs Fake Honey: तुम्ही खात असलेलं मध शुद्ध आहे की भेसळयुक्त? घरच्या घरी करा ही सोपी टेस्ट

SCROLL FOR NEXT