Real vs Fake Honey: तुम्ही खात असलेलं मध शुद्ध आहे की भेसळयुक्त? घरच्या घरी करा ही सोपी टेस्ट

Shruti Vilas Kadam

कॉटन बड आणि माचिसची काडी

कॉटन बडवर किंवा माचिसची काडीवर थोडा मध लावून तो पेटवून पाहा. लगेच आग लागली तर ते मध खरं आहे.

Honey | pinterest

पाण्यात मध टाकून पाहा

एका ग्लासमध्ये पाणी घ्या. त्यात एक चमचा मध टाका. मध पाण्यात कसा मिसळतो, हे पाहा. मध ग्लासाच्या तळाशी गेल तर ते शुद्ध आहे आणि जर रंग सोडला तर ते भेसळयुक्त आहे.

Honey | pinterest

अंगठ्यावर मध टाकून पाहा

अंगठ्यावर मधाचा एक थेंब टाका. मध लगेच पसरतो की जागेवरच राहतो, हे पाहा. मात्र, या चाचणीवरून मधाची शुद्धता समजू शकत नाही. जर मध घट्ट आणि शुद्ध असेल, तर ते नखावर पसरणार नाही, तसंच राहील.

Honey | pinterest

मधाचा रंग पाहा

मधाचा रंग हलका पिवळा किंवा गडद तपकिरी असू शकतो. वेगवेगळ्या फुलांपासून तयार होणाऱ्या मधाचा रंग वेगळा असतो. त्यामुळे रंगावरून मध खरा की खोटा हे ठरवू नका.

Honey | Google

मधाचा वास घ्या

खऱ्या मधाला नैसर्गिक सुगंध असतो. काही मधाला फुलांसारखा वास येतो. आणि भेसळयुक्त मधाला सहसा वास येत नाही.

Honey | yandex

मध घट्ट झाला तर काळजी करू नका

थंडीमध्ये मध घट्ट होतो आणि त्यात साखरेसारखे छोटे दाणे तयार होतात. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे मध घट्ट झाला म्हणजे तो भेसळयुक्त आहे, असं समजू नका.

Honey | pinterest

मध खरेदी करताना लेबल तपासा

मध खरेदी करताना त्यावरील पॅकिंग, उत्पादनाची तारीख आणि एक्सपायरी डेट तपासा. तसेच FSSAI परवाना क्रमांकही पाहा.

Honey

डिस्क्लेमर

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही.

Honey

Relationship Tips: प्रेमात आहात, तुमचा पार्टनर रिलेशनशिपबाबत सीरियस की टाईमपास करतोय? 7 सिक्रेट अन् मिळेल खरं उत्तर

Relationship Tips | Saam Tv
येथे क्लिक करा