Shruti Vilas Kadam
प्रत्येकजण कामात व्यस्त असतो. पण तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती कितीही व्यस्त असली तरी तुमच्यासाठी वेळ काढते. ती तुम्हाला फोन करते, मेसेज करते आणि भेटण्याचा प्रयत्न करते.
तुम्हाला काय आवडतं, काय आवडत नाही, कोणता पदार्थ आवडतो, या छोट्या गोष्टी तुमचा पार्टनर लक्षात ठेवतो. यावरून त्याला तुमची किती काळजी आहे हे समजतं.
तुमचा पार्टनर तुमच्याबाबत सीरियस असेल तर तो तुम्हाला त्याच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबीयांशी भेटवतो. तसेच तुमच्या कुटुंबातील लोकांनाही जाणून घेण्याचा प्रयत्न करतो.
आनंदात सगळेच सोबत असतात. पण अडचणीच्या वेळी तुमचा पार्टनर तुमच्या पाठीशी उभा राहतो. तुमच्या समस्या ऐकून घेतो आणि गरज पडल्यास मदतही करतो.
तुमचा पार्टनर तुमच्याशी नेहमी प्रेमाने वागतो आणि नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करतो. तो तुमच्याकडे दुर्लक्ष करत नाही. तुमच्याशी बोलणं आणि वेळ घालवणं त्याला आवडतं.
तुमचा पार्टनर तुमच्या आवडीनिवडी आणि निर्णयांचा आदर करतो. कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी तुमचं मत विचारतो. तसेच तुम्हाला तुमच्या पद्धतीने जगण्याचं स्वातंत्र्य देतो.
तुमचा पार्टनर भविष्यातील प्लॅनिंगबद्दल बोलताना तुमचाही विचार करतो. एकत्र फिरायला जाणं, नवीन गोष्टी करण्याचं ठरवणं किंवा भविष्यातील निर्णय घेताना तुमचं मत विचारणं, यातून त्याला हे नातं महत्त्वाचं वाटतं.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही.