Beed Jawan Missing : सिक्कीममधील महापुरात बीडमधील 36 वर्षीय जवान बेपत्ता, कुटुंबीय चिंतेत

Beed Jawan Missing Sikkim Flood : सिक्कीममध्ये कर्तव्यावर असलेले बीडचे जवान पांडुरंग तावरे हे देखील गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता झाले आहेत.
Beed
BeedSaam TV
Published On

Beed News :

सिक्कीममध्ये अचानक झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे महापूर आला होता. या महापुरात जवळपास 23 जवानांसह शेकडो नागरिक वाहून गेल्याची माहिती समोर आली. आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण अजूनही बेपत्ता आहेत.

सिक्कीममध्ये कर्तव्यावर असलेले बीडचे जवान पांडुरंग तावरे हे देखील गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता झाले आहेत. पती बेपत्ता झाल्याने त्यांच्या पत्नीसह कुटुंबीय चिंतेत आहेत. सिक्कीममध्ये मंगळवारी पहाटे 1.30 वाजता ढगफुटी झाली. त्यामुळे तिस्ता नदीला पूर आला होता. नदीच्या पाण्याची पातळी 15 ते 20 फुटांनी वाढली होती. यामुळे नदीलगतच्या भागातही पूर आला.

यादरम्यान नदीलगतच्या परिसरात असलेली लष्कराची छावणी, पुरात वाहून गेली आणि तेथे उभी असलेली 41 वाहने देखील बुडाली. अनेक जवानही वाहून गेले. या जवानांमध्ये बीडमधील 36 वर्षीय जवान पांडुरंग वामन तावरे देखील बेपत्ता झाले आहेत. (Latest Marathi News)

Beed
Sikkim Floods : सिक्कीममधील पुरात 14 जणांचा मृत्यू, 102 नागरिक बेपत्ता; ISRO ने शेअर केले सॅटलाईट फोटो

पांडुरंग तावरे हे पाटोदा तालुक्यातील काकडहिरा येथील आहेत. 2009 मध्ये आर्मी भरतीमध्ये ते रुजू झाले. मागील 14 वर्षांपासून ते 18 महार बटालियनमध्ये नायक या पदावर आहेत. त्यांनी दिल्ली, राजस्थान, आसाम, बिकानेर, हिमाचल प्रदेश, अरुनाचल प्रदेश, मध्यप्रदेश , लेबनॉन, पंजाब विविध ठिकाणी देशसेवा केली.

रात्री ते बंगाल बॅंकडुगी युनिटकडे निघाले होते. ते स्वतः एका वाहनाचे चालक आहेत. दरम्यान त्यांचे मंगळवारी रात्री 9.30 च्या दरम्यान पत्नी गोदावरी यांच्याशी बोलण झालं होतं. तेव्हापासून आजपर्यंत त्यांचा संपर्क झालेले नाही, त्यामुळे कुटुंब चिंतेत आहे.

Beed
Sikkim Flood: सिक्कीममध्ये पावसाचा हाहाकार; महापुरात वाहून गेलेल्या २३ पैकी १ जवान सापडला, आतापर्यंत ८ नागरिकांचा मृत्यू

धनंजय मुंडेंचा कुटुंबियांना फोन

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी तावरे यांच्या कुटुंबियांशी फोनवर संपर्क करून धीर दिला आहे. जवानाची माहिती तातडीने मिळावी व त्यांचा शोध घेऊन त्याची माहिती कुटुंबियांपर्यंत तातडीने पोहोचवली जावी, याबाबत धनंजय मुंडे यांनी बीडचे जिल्हाधिकारी ते दिल्लीपर्यंत यंत्रणांना दूरध्वनीद्वारे सूचना दिल्या आहेत. जवान पांडुरंग तावरे यांच्या शोधासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com