Sikkim Floods : सिक्कीममधील पुरात 14 जणांचा मृत्यू, 102 नागरिक बेपत्ता; ISRO ने शेअर केले सॅटलाईट फोटो

ISRO Share Sikkim Floods Photos : सिक्कीम सरकारने दिलेल्या माहितीनुसार, अचानक आलेल्या पुरामुळे 14 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 102 लोक बेपत्ता झाले आहेत.
Sikkim Floods
Sikkim FloodsSaam TV
Published On

Sikkim News :

सिक्कीमच्या लोनाक सरोवराचा परिसरात ढगफुटीसदृष पावसामुळे मोठं नैसर्गिक संकट निर्माण झालं. ढगफुटीमुळे लोनाक सरोवराचे पाणी ओव्हरफ्लो होऊन वाहू लागले. त्यामुळे तीस्ता नदीला अचानक महापूर आला. या पुराची तीव्रताही जास्त होती. या नैसर्गिक आपत्तीचे काही सॅटलाईट फोटो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने (ISRO) जारी केले आहेत.

सिक्कीम सरकारने दिलेल्या माहितीनुसार, अचानक आलेल्या पुरामुळे 14 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 102 लोक बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता नागरिकांनामध्ये 23 सैनिकांचाही समावेश आहे. याशिवाय 26 जण जखमी झाले आहेत. बेपत्ता नागरिकांचा शोध सुरू आहे. भारतीय लष्कर आणि प्रशासनाने बचावकार्य आणि शोधमोहिम सुरु केली आहे. (Latest Marathi News)

Sikkim Floods
Sikkim Flood: सिक्कीममध्ये पावसाचा हाहाकार; महापुरात वाहून गेलेल्या २३ पैकी १ जवान सापडला, आतापर्यंत ८ नागरिकांचा मृत्यू

इस्रोच्या टेम्पोरल सॅटेलाइट हे फोटो जारी केले आहेत. 17 सप्टेंबर आणि 28 सप्टेंबर रोजी घेतलेल्या छायाचित्रांमध्ये तलावाची स्थिती दाखवण्यात आली आहे. बुधवारी 4 ऑक्टोबर सकाळी सहा वाजता काढलेले चित्र पाहता तलावाचा आकार निम्म्यावर आल्याचे दिसून येत आहे. 100 हेक्‍टरहून अधिक क्षेत्रावर पसरलेले पाणी वाया गेले असून आता केवळ 60.3 हेक्‍टर क्षेत्रावरच पाणी उपलब्ध आहे.

सिक्कीममध्ये ढगफुटी आणि त्यानंतर अचानक आलेल्या पुरामुळे राज्यात मोठी हानी झाली आहे. त्यामुळे एका जलविद्युत प्रकल्पाचा मोठा भाग वाहून गेला असून अनेक लोक बेपत्ता झाले आहेत.

इस्रोने सांगितले की, 17, 18 सप्टेंबर आणि 4 ऑक्टोबर रोजी तलावाच्या क्षेत्रात बदल झाले आहेत. ढगफुटीमुळे तलावातील 105 हेक्टर पाणी वाहून गेल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अचानक पूर आला. या स्थितीवर आम्ही यापुढेही लक्ष ठेवणार आहोत, असं इस्रोने म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com