रुपाली ठोंबरे पाटील यांची प्रवक्तेपदावरून उचलबांगडी
रुपाली ठोंबरे पाटील नाराज असल्याची चर्चा
रुपाली ठोंबरे पाटील यांची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्तेपदावरून रुपाली ठोंबरे पाटील यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. रुपाली चाकणकर यांच्याशी झालेल्या वादामुळे त्यांची राजकीयपदावरून पदावनती झाल्याची चर्चा आहे. यामुळे मनसे सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या रुपाली ठोंबरे पाटील नाराज असल्याची चर्चा आहे. नाराजीच्या चर्चेदरम्यान रुपाली ठोंबरे पाटील यांची सोशल मीडियावर एक पोस्ट चर्चेत आली आहे.
अजित पवार गटाच्या पक्षाच्या प्रवक्त्यांची काल नवीन यादी जाहीर करण्यात आली. या यादीतून आमदार अमोल मिटकरी आणि रुपाली पाटील ठोंबरे यांचं नाव वगळल्याचे समोर आलं. दोन्ही दिग्गज नेत्यांच्या नाव का वगळलं, यावर अजित पवार गटाने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, दोन महत्वाची नावे वगळल्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणावरून रुपाली ठोंबरे पाटील यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली होती. दोन्ही महिला नेत्यांचा वाद हा अजित पवारांपर्यंत पोहोचला होता. कारणे दाखवा नोटीस दिल्यावर तात्काळ रूपाली ठोंबरे यांचं पद पक्षाने काढून घेतलं होतं. याच वादानंतर रुपाली पाटील ठोंबरे यांचं नाव पक्षाच्या नव्या प्रवक्तेपदाच्या यादीतून वगळल्याची चर्चा आहे. प्रवक्तेपदावरून गच्छंती झाल्यानंतर रुपाली ठोंबरे पाटील उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. अजित पवार हे उद्या पुणे दौऱ्यावर आहेत.
दुसरीकडे रूपाली ठोंबरे यांना दोन्ही शिवसेनेकडून पक्षात येण्याची ऑफर मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे ठोंबरे पाटील काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागलेलं असताना त्यांची फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे.
'शेतकरीकन्या डॉक्टर निर्भया यांना न्याय न देता, त्यांच्या चारित्र्यावर आघात करण्यात आला. या अन्यायाविरुद्ध आपण आवाज उठवणार. माझा आवाज दाबला जाईल? 'प्रस्थापित व्यवस्थेच्या छाताडावर पाय रोवून मी इथपर्यंत पोहोचले आहे. आमचा इतिहास हा अन्याय सहन करणाऱ्यांचा नाही. गरज पडली तर 'ख्वाडा' करणाऱ्यांचा आहे. जय शिवराय, जय भीम, जय अहिल्या, जय भगवान, असं त्यांनी म्हटलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.