rupali chakankar Saam tv
मुंबई/पुणे

अशोक खरातची दुसरी बाजू....; राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकर यांची पहिली प्रतिक्रिया

rupali chakankar news : राजीनाम्यानंतर रुपाली चाकणकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. अशोक खरातची दुसरी बाजू माहीत नसल्याचे चाकणकरांनी स्पष्ट केले.

Vishal Gangurde

रुपाली चाकणकर यांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

राजीनाम्यानंतर चाकणकर यांची पहिली प्रतिक्रिया

आरोपी खरातवर केली कारवाईची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. रुपाली चाकणकर यांनी अशोक खरातवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. खरातची दुसरी बाजू माहीत नव्हती, असंही चाकणकर यांनी सांगितले.

रुपाली चाकणकर म्हणाल्या, 'महादेवाच्या मंदिराचं ट्रस्ट आहे. या ट्रस्टवर प्रदेशाध्यक्ष असल्यापासून सदस्य म्हणून काम केलं आहे. समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती ट्रस्टवर होते. या ट्रस्टवर होते, त्यानंतर आयोगाची अध्यक्ष झाले. या ट्रस्टचा कार्यकाळ ८ ऑगस्ट २०२५ रोजी संपला. आयुष्य जगत असताना कोणालातरी गुरू मानत असतो. खरात पती-पत्नीला आम्ही गुरू मानलं. गुरुपोर्णिमा, महाशिवरात्रीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत होतो. यात एखाद्या व्यक्तीला गुरू मानलं. त्यामुळे कुटुंबासहित उपस्थित राहत होतो'.

'माध्यमातील व्हिडिओ काही वर्षांपूर्वीचे आहेत. अनेकांनी त्याची पाद्यपूजा केली होती. तशीच मी केली. पाच-सहा वर्षांनंतर एखाद्या व्यक्तीचे वैयक्तिक आयुष्याबाबत कोणतीही कल्पना नसते. आपल्यासोबतचे कोण कसे वागेल, याची कल्पना कोणाला नसते. त्यामुळे ही घटना समजली. त्यावेळी मला धक्का बसला. त्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट केले. खरातच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहीत नव्हतं, असे चाकणकरांनी स्पष्ट केले.

'या प्रकरणता पोलिसांनी खोलवर तपास करावा, असे मी सांगितले. पोलीस महासंचालकांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचीही भेट घेतली. या प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा, यासाठी भेट घेतली. प्रत्येकाची आध्यात्मिक श्रद्धा असते. माझं कुटुंब वारकरी आहे. यामुळे कुटुंब देवस्थानाशी जोडलो. जे घडलं, ते अत्यंत चुकीचं आहे. अतिशय घाणेरडं कृत्य आहे. आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी वरिष्ठांकडे मागणी केल्याचे चाकणकरांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माकपच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन; राजकारणात शोककळा

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंना केंद्रीय मंत्र्यांची खुली ऑफर, राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या

Ambenali Ghat Closed: आंबेनळी घाट ४ दिवस वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद, पर्यायी मार्ग कोणते? VIDEO

Saturday Horoscope : नवी संधी मिळणार; ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार, वाचा शनिवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: रत्नागिरी - खेड शहराच्या मटण मार्केट परिसरात शिरलं जगबुडी नदीच्या पुराचं पाणी

SCROLL FOR NEXT